Filhaal 2 Song : अक्षय कुमार-नुपूर सॅनॉनच्या केमिस्ट्रीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मने, पाहा नवं गाणं…

गायक बी प्राक (B Praak) याने आपल्या आवाजाने चाहत्यांच्या हृदयात घर केले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा बी प्राकने अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि नुपूर सॅनॉनची (Nupur Sanon) गाणी चाहत्यांसमोर सादर केली, तेव्हा सर्वांनाच याची गोडी लागली.

Filhaal 2 Song : अक्षय कुमार-नुपूर सॅनॉनच्या केमिस्ट्रीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मने, पाहा नवं गाणं...
फिलहाल 2
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 5:16 PM

मुंबई : गायक बी प्राक (B Praak) याने आपल्या आवाजाने चाहत्यांच्या हृदयात घर केले आहे. अशा परिस्थितीत जेव्हा बी प्राकने अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि नुपूर सॅनॉनची (Nupur Sanon) गाणी चाहत्यांसमोर सादर केली, तेव्हा सर्वांनाच याची गोडी लागली. आता या गाण्याचा दुसरा भाग चाहत्यांसमोर सादर करण्यात आला आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर आज (6 जुलै) ‘फिलहाल 2’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे (Nupur Sanon And Akshay Kumar Satrrer Filhaal 2 Song release).

अक्षय-नुपूरच्या या नवीन गाण्याचे नाव ‘फिलहाल 2 मोहब्बत’ (Filhaal 2 Mohabbat) आहे. अक्षय आणि नूपुरचं नातं आणि दुःखाने भरलेलं गाणे पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अक्षय आणि नुपूर यांनी स्वत: ‘फिलहाल 2’ हे गाणे चाहत्यांसाठी शेअर केले आहे.

पाहा गाणे :

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बी प्राक याच्या या नवीन गाण्यात दोन प्रेमींची कथा सादर केली गेली आहे, ज्यांना काही कारणास्तव वेगळे व्हावे लागले. गाण्यात असे दर्शवले गेले आहे की, मुलगी लग्न करते आणि नंतर मुलगा विचारतो की, तरीही तू माझ्यावर प्रेम करतेस का? गाणे केवळ या कथेभोवतीच फिरत असल्याचे दिसते.

गायक बी प्राक याने ‘फिलहाल 2 मोहब्बत’ हे गाणे गायले असून, त्याचे बोल जानी यांनी लिहिले आहेत. त्याचबरोबर या गाण्याच्या व्हिडीओमध्ये अक्षय आणि नुपूरच्या प्रेमाची केमिस्ट्री पुन्हा चाहत्यांची मने जिंकत आहे, हे गाणे खूपच सुंदररित्या चित्रीत करण्यात आले आहे.

या हृदयस्पर्शी गाण्याचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. ‘फिलहाल’ हा म्युझिक व्हिडीओ 2019मध्ये रिलीज झाला होता आणि त्याने अनेक रेकॉर्ड तयार केले आहेत. हे यूट्यूबवरील एक अब्ज व्ह्यूचा टप्पा ओलांडणारे पहिले भारतीय गाणे बनले आहे.

या गाण्याचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर चाहते या गाण्याच्या प्रतीक्षेत होते. अलीकडेच या गाण्याचे टीझर यूट्यूबवर ट्रेंडिंग 1 नंबरवर होता. रिलीजच्या काही तासांतच या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घालायला सुरू केली आहे.

(Nupur Sanon And Akshay Kumar Satrrer Filhaal 2 Song release)

हेही वाचा :

Sonu Sood Worshipped : सोनू सूदकडून नेल्लोरमध्ये  पहिला ऑक्सिजन प्लांट स्थापन, अभिनेत्याच्या फोटोची लोकांकडून पूजा!

Chura Ke Dil Mera 2.0 : शिल्पा शेट्टीच्या नृत्याने पुन्हा एकदा जिंकलं प्रेक्षकांचं मन, ‘चुरा के दिल मेरा’च्या नव्या व्हर्जनवर लाईक्सचा पाऊस!

Drugs Case | ‘बिग बॉस’ फेम एजाज खानचा जामीन अर्ज फेटाळला, ड्रग्ज प्रकरणी पोलिसांकडून अटक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.