नवजात बाळासह नुसरत जहाँला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, यश दासगुप्ताच्या हातात दिसले अभिनेत्रीचे बाळ!

तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) अलीकडेच आई झाल्या आहेत. नुसरत जहाँने गुरुवारी दुपारी म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. नुकताच, नुसरतच्या फॅन पेजवरून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेत्री तिचे नवजात बाळ आणि बॉयफ्रेंड अभिनेता यश दास गुप्तासह हॉस्पिटलमधून बाहेर येताना दिसत आहे.

नवजात बाळासह नुसरत जहाँला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, यश दासगुप्ताच्या हातात दिसले अभिनेत्रीचे बाळ!
Nusrat Jahan baby
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 11:34 AM

मुंबई: तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली चित्रपट अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat Jahan) अलीकडेच आई झाल्या आहेत. नुसरत जहाँने गुरुवारी दुपारी म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. नुकताच, नुसरतच्या फॅन पेजवरून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेत्री तिचे नवजात बाळ आणि बॉयफ्रेंड अभिनेता यश दास गुप्तासह हॉस्पिटलमधून बाहेर येताना दिसत आहे. नुसरत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचे वृत्त आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे नुसरत जहाँचा मुलगा त्यांचा बॉयफ्रेंड यश दासगुप्तासोबत (Yashdas Gupta) त्याच्या मांडीवर दिसत होता. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, नुसरत हॉस्पिटलमधून बाहेर पडते आणि थेट कारमध्ये बसते. या दरम्यान, नुसरत आणि यश दोघेही कॅमेऱ्याच्या नजरेपासून स्वतःचा बचाव करताना दिसतात. नुसरतच्या आसपास रक्षक उपस्थित असतात. अभिनेत्रीने आपल्या मुलाचे नाव ईशान ठेवले आहे.

पहा व्हिडीओ

नुसरत जहाँ यांना बुधवारी संध्याकाळी कोलकात्यातील पार्क स्ट्रीटवरील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने गुरुवारी दुपारी 12:20 च्या सुमारास आपल्या मुलाला जन्म दिला. गुरुवारी या दरम्यान, अभिनेत्रीचा मित्र यश दासगुप्ता देखील रुग्णालयात उपस्थित होता. त्याचबरोबर नुसरत जहाँपासून विभक्त झालेल्या निखिल जैननेही अभिनेत्री आणि नवजात मुलाला शुभेच्छा दिल्या. निखिल म्हणाला, ‘आमच्यात मतभेद असू शकतात, तरीही मी नवजात बाळाला आणि त्याच्या आईला शुभेच्छा देतो. मी मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतो.’

नुसरत जहाँ बऱ्याच काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि गर्भधारणेबद्दल चर्चेत आहे. ती बराच काळ पती निखिल जैनपासून वेगळी राहत आहे. निखिल जैनसोबत विभक्त होण्याबरोबरच नुसरत जहाँबद्दल आणखी एक चर्चा आहे. त्यांच्या आणि यश दासगुप्ता यांच्यातील नाते संबंधांचीही चर्चा आहे.

नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर चर्चेत

नुसरत काही महिन्यांपूर्वी तिचं लग्न तुटल्यामुळे चर्चेत आली होती. कोलकाता येथील उद्योजक निखिल जैन याच्याशी तिचं लग्न वादात सापडलं तेव्हा तिनं आपलं हे लग्न अवैध असल्याचं सांगितलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून हे दोघं वेगळे राहत होते. नुसरतनं सांगितलं होतं की तिचं निखिलसोबतच लग्न अवैध आहे कारण ते तुर्की रीतीरिवाजांनुसार झालं होतं आणि भारतात विशेष विवाह कायद्यानुसार याला मान्यता नाही, त्यामुळे घटस्फोटाचं कारणच येत नाही.

पती निखिल जैननं केले अनेक आरोप

यानंतर निखिलनं नुसरतवर अनेक आरोपही केले होते, त्यानं म्हटलं होतं की नुसरतनं त्याच्याकडून खूप पैसे घेतले होते आणि नुसरतच्या पोटातील मूल हे त्याचं नाही. निखिल आणि नुसरत यांनी 2019 मध्ये तुर्कस्तानच्या बोडरम येथं धूमधडाक्यात लग्न केलं होतं.

हेही वाचा :

रांगड्या जोडीचा ‘राजेशाही’ थाट, राणा दा आणि पाठक बाईंचं नवं रॉयल फोटोशूट पाहिलंत का?

काळेभोर केस… निळेशार डोळे… निळा ड्रेस… दिसते जणू परी; राजेश्वरी म्हणते, मी तर परम सुंदरी

मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.