Amitabh Bachchan | अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त जलसा बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी…
अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय. फक्त भारतातूनच नव्हे तर परदेशातून चाहते बिग बींना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई : बॉलिवूडचे शहेनशाह अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. विशेष म्हणजे बिग बी यंदाचा वाढदिवस मुंबईतच साजरा करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर काल रात्रीपासूनच चाहत्यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केलीये. फक्त भारतातूनच (India) नव्हे तर परदेशातून चाहते बिग बींना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर गर्दी करतायंत. आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी कोणी फोटो फ्रेम (Photo frame) तर कोणी कविता लिहिलेल्या फ्रेम आणल्या आहेत.
अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस असल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतोय. फक्त राज्यातूनच नव्हे तर परदेशातून देखील लोक अमिताभ बच्चन यांना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत पोहचले आहेत. पुण्यातील एका चाहत्याने आपल्या हातावर अमिताभ बच्चन यांचा कायमस्वरूपी टॅटू बनवला आहे. अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर खास शैलीत डान्स करू वाढदिवसाच्या शुभेच्छा चाहत्यांनी दिल्या.
काल रात्री चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी स्वत: अमिताभ बच्चन यांनी बाहेर येत चाहत्यांचे आभार मानले. इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी यावेळी केकही कापला. अमिताभ बच्चन यांचा हा खास व्हिडीओ आता सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोयं. सोशल मीडियावरही बिग बींना मोठ्या प्रमाणात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.