राज कुंद्रासोबत लग्न करण्यास तयार नव्हती शिल्पा शेट्टी, मग नेमकं कसं जुळलं दोघांचं सुत?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या खूप चर्चेत आहे. अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि ते विकल्याप्रकरणी राज कुंद्रा सध्या तुरूंगाची हवा खात आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) सध्या खूप चर्चेत आहे. अश्लील चित्रपट बनवण्यासाठी आणि ते विकल्याप्रकरणी राज कुंद्रा सध्या तुरूंगाची हवा खात आहे. अशा परिस्थितीत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे लग्न नेमके कसे जुळले?, याबद्दल आता सर्वांना जाणून घ्यायचे आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे लग्न 2009 मध्ये झाले.
शिल्पा आणि राज यांना दोन मुले देखील आहेत, ज्यांची नावे वियान आणि समिशा आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की, एक काळ असा होता जेव्हा शिल्पा शेट्टींला राज कुंद्रासोबत लग्न करायचे नव्हते.
राज कुंद्राने सांगितले सत्य
मीडिया रिपोर्टनुसार राज कुंद्राने एका मुलाखतीत आपल्या लव्ह लाईफबद्दल सांगितले होते. तो शिल्पाला कसा भेटला आणि ते कसे प्रेमात पडले, हे त्याने सांगितले होते. या मुलाखतीत राजने शिल्पाशी त्याची पहिली भेट यू.के.मध्ये झाल्याचे सांगितले. अभिनेत्रीने ‘बिग ब्रदर’ जिंकल्यानंतर त्यांची भेट झाली होती. त्यावेळी तो एक परफ्यूम बनवण्याच्या कल्पनेने तिच्याकडे गेला होता. शिल्पाशी पहिल्या भेटीत जेव्हा राजने अभिनेत्रीच्या आईच्या पाया पडला, तेव्हा शिल्पाला ही गोष्ट खूप आवडली.
शिल्पाने राजला दिला नकार
एक काळ असा होता की, शिल्पाला राजबरोबर कोणत्याही प्रकारच्या नात्यात अडकण्याची इच्छा नव्हती. राज कुंद्राने सांगितले होते की, जर मी असे म्हणालो की शिल्पाने माझ्याशी लग्न करावे अशी माझी इच्छा होती, तर ते खोटे ठरणार नाही. कारण मी शिल्पाच्या मागे लागलो होतो. मला माहित होते की काही प्रमाणात तिला देखील माझ्याबद्दल प्रेम वाटत होते.
माध्यम वृत्तानुसार, राज कुंद्राने त्याच्या एका मुलाखतीत शिल्पा खूपच प्रामाणिक असल्याचेही सांगितले होते. त्यावेळी शिल्पाने स्पष्ट केले होते की, तू (राज) लंडनमध्ये राहतोस, मात्र मी मुंबई कधीच सोडू शकत नाही.
शिल्पाच्या नकाराचे कारणच खोडून काढले!
शिल्पाने राजला मी मुंबई सोडणार नाही, असे सांगितले तेव्हा राज कुंद्राने जराही वेळ न दवडता मुंबईत स्वत:चे घर विकत घेतले. निर्माता वासू भगनानी यांनी राज यांना घर विकत घेण्यास मदत केल्याचे बोलले जाते. माध्यमांच्या वृत्तानुसार, घर विकत घेतल्यानंतर राज म्हणाला होता की, जर तुला मुंबई सोडायची नसेल, तर मी बच्चन सरांच्या यांच्या घरासमोर हे घर खरेदी केले आहे. यानंतरच राजने शिल्पाला खास स्टाईलने प्रपोज केले आणि त्यानंतर अभिनेत्रीने त्याचे प्रपोजल मान्य केले.
(Once Shilpa Shetty was not ready to marry Raj Kundra)
हेही वाचा :
पुन्हा एकदा शमिता शेट्टी बहीण शिल्पाच्या समर्थनात, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली…