Aamir Khan | ‘या’ विधानामुळेच आमिर खान याला स्पष्टीकरण देण्याची आली होती वेळ, मी आणि किरण याच देशामध्ये…
लाल सिंह चड्ढा या चित्रपटाकडून आमिर खान याला खूप जास्त अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट फ्लाॅप गेला. कोरोनानंतर प्रेक्षकांनी बाॅलिवूड चित्रपटांकडे पाठ फिरवीये.
मुंबई : आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेलाय. मात्र, चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान (Aamir Khan) देखील गायब झालाय. काही दिवसांपूर्वी आमिर खान याचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोमध्ये आमिर खान याचा थकलेला चेहरा आणि पांढरी दाढी पाहून चाहते काळजीमध्ये पडले होते. कोणत्याही पार्टीमध्ये जाणे आमिर खान टाळत आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटाकडून आमिर खान याला खूप जास्त अपेक्षा होत्या. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट (Movie) फ्लाॅप गेला. कोरोनानंतर प्रेक्षकांनी बाॅलिवूड चित्रपटांकडे पाठ फिरवीये. दुसरीकडे साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरल आहेत. आमिर खानची लेक इरा खान हिचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी पार पडलाय.
आमिर खान याने सांगितले होते की, चित्रपटांमध्ये काम करण्याच्या नादामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाहीये. यामुळे मी आता काही वर्ष कुटुंबाला अगोदर वेळा देईल आणि नंतर नव्या जोमाने कामाला लागेल.
लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट जशी जवळ येत होती. तेंव्हा सोशल मीडियावर लाल सिंह चड्ढा चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहिम सातत्याने सुरू होती आणि याचाच फटका चित्रपटाला बसल्याचे सांगितले जातंय.
यादरम्यान आमिर खान आणि त्याच्या पत्नीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत होता. या व्हिडीओमध्ये असहिष्णुतेच्या मुद्दावर बोलताना आमिरची पत्नी किरण रावने म्हटले होते की, या देशामध्ये राहण्यास भीती वाटते.
यानंतर आमिर खान हा आप की अदालत शोमध्ये पोहचला होता. त्यावेळी त्याने यावर स्पष्टीकरण देत सांगितले होते की, मी आणि किरण इथेच जन्मलो आहोत आणि इथेच मरणार आहोत…कारण किरण राव हिने केलेल्या त्या विधानानंतर मोठी टीका करण्यात आली होती.
आमिर खान याने शोमध्ये बोलताना सांगितले की, किरणने खरंतर भावना व्यक्त केल्या होत्या…आमिर खान याच्या लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या रिलीजच्या अगोदर हा व्हिडीओ व्हायरल होत होत्या. लाल सिंह चढ्डा या चित्रपटामध्ये आमिर खान याच्यासोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत होती.