मुंबई : मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजूळे (Nagraj Manjule) यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. मात्र या चित्रपटाच्या थिएटर रिलीजवर अजूनही सस्पेन्स आहे. चित्रपटाचे ओटीटी राइट्स 33 कोटींना विकल्याची माहिती आहे. असं मानलं जातंय की जर महाराष्ट्रात चित्रपटगृहं उघडण्यास आणखी विलंब झाला, तर कदाचित ‘झुंड’ हा अमिताभचा दुसरा चित्रपट असेल, जो थेट ओटीटीवर प्रदर्शीत केला जाईल. याआधी अमिताभ यांचा ‘गुलाबो सिताबो’ OTT वर रिलीज झाला होता.
हा आठवडा बॉलिवूडसाठी नवीन आशा घेऊन आला आहे. अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ प्रदर्शित झाला आहे. यानंतर, अमिताभ-इमरान हाश्मीचा ‘चेहरे’ 27 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. महाराष्ट्रात चित्रपटगृहं बंद आहेत, तेलंगणा व्यतिरिक्त, इतर राज्यांमधील चित्रपटगृहे 50% ओक्युपेन्सीसह खुली आहेत. चित्रपटांच्या कमाईसाठी महाराष्ट्रात चित्रपट रिलीज होणं जास्त महत्त्वाचं आहे. असं मानलं जातं की चित्रपटाच्या कमाईपैकी सुमारे 25% कमाई महाराष्ट्रातूनच होते. बेल बॉटम आणि चेहरेच्या निर्मात्यांनी महाराष्ट्रातून कमाई सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला आहे, परंतु ‘झुंड’ साठी ते शक्य नाही.
‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे ‘झुंड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. महाराष्ट्राचे फुटबॉल प्रशिक्षक विजय बारसे यांचा हा बायोपिक आहे. हेच कारण आहे की चित्रपटाच्या 25% नाही तर त्यापेक्षा जास्त कमाई एकट्या महाराष्ट्रातून होऊ शकते. कथा, दिग्दर्शक आणि व्यावसायिक कोन हे सर्व लक्षात घेऊन हा चित्रपट महाराष्ट्राच्या प्रेक्षकांशिवाय देशाच्या इतर भागांमध्ये रिलीज करण्याचा कोणताही विशेष फायदा होणार नाहीये.
ओटीटीचा मार्गही खुला
अमिताभ हे भारतीय सिनेमाचे आयकॉन आहेत, स्पोर्ट्स बायोपिक्स देखील बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय आहेत. नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. एवढंच नाही तर त्यावर बरीच टीकाही झाली. हा चित्रपट संपूर्ण भारतभर पाहिला गेला. त्यानंतर ‘धडक’ या चित्रपटाचा हिंदी रिमेकही बनवण्यात आला, ज्यातून जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
‘झुंड’मध्ये बरेच प्लस पॉइंट आहेत, परंतु व्यावसायिक व्यवहार्यता देखील महत्त्वाची आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांनी अंदाजे 20 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे ओटीटी अधिकार 33 कोटींना विकून व्यावसायिक धोका टाळला आहे.
संबंधित बातम्या
Huma Qureshi : हुमा कुरेशीच्या बोल्ड फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा, हे फोटो पाहाच