शाहरुख, आमिर आणि सलमान पाकिस्तानी कलाकारांना घाबरतात; अभिनेत्रीची बेताल बडबड
पाकिस्तानी अभिनेत्री नादिया खान सध्या चर्चेत आहेत. तिच्या बेताल बडबडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नादिया चर्चेत आली आहे. नादियाने थेट शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानवर टीका केली आहे. हे तिन्ही कलाकार पाकिस्तानी कलाकारांना घाबरतात असं तिचं म्हणणं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बॉलिवूड कलाकरांनी जगभर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी हॉलिवूडमध्ये जमही बसवला आहे. बॉलिवूडमधील खान मंडळी तर सर्वच देशात प्रसिद्ध आहे. त्यांचे सिनेमे सर्वच देशात मोठा गल्ला जमवत असतात. मात्र, पाकिस्तानची अभिनेत्री आणि टीव्ही प्रेझेंटर नादिया खान हिने धक्कादायक विधान केलं आहे. शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान हे पाकिस्तानी कलाकारांना घाबरतात, अशी बेताल बडबड नादियाने केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अभिनेत्री नादिया खान हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हाकलवून लावण्याचा प्रयत्न केला गेल्याचं तिने म्हटलं आहे. ‘क्या ड्रामा है’ या शोमध्ये तिने हे विधान केलं आहे. सलमान खान, आमिर आणि शाहरुख खानसहीत इतर भारतीय कलाकारांना फवाद खान सारख्या तरुण पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रसिद्धीचा धोका आहे. पाकिस्तानी कलाकारांवर लावण्यात आलेला बॅन राजकीय नव्हता. तर त्याच्या मागचं असली कारण वेगळंच होतं. बॉलिवूडच्या कलाकारांनी हे सर्व घडवून आणलं होतं, अशी बेताल बडबडही नादियाने केली आहे.
बॉडी दाखवण्याची गरज नाही
जेव्हा फवाद सारख्या पाकिस्तानी कलाकारांनी भारतात काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे भारतातील काही मोठे कलाकार असुरक्षित झाले. त्यांनी हा मुद्दा बनवला आणि आपल्या कलाकारांवर बंदी घातली. राजकारण्यांना पाकिस्तांनी कलाकारांचे काही वावडे नव्हते. पण भारतीय कलाकारांना पाकिस्तानी कलाकारांची भीती वाटू लागली. भारतीय जनता पाकिस्तानी कलाकारांवर फिदा होईल हे त्यांना माहीत होतं. कारण पाकिस्तानी कलाकार खरोखर टॅलेंटेड आहेत. त्यांना आपली बॉडी दाखवण्याची गरज नाही. त्यांचे डोळे आणि संवाद फेक सर्व काम करते, असं तिने म्हटलंय.
पाक कलाकार भावनिक
भारतीय जनता पाकिस्तानी कलाकारांना पसंद करते. पाकिस्तानी कलाकार भारतात प्रचंड लोकप्रिय आहेत. मात्र, भारतीय शोच्या तुलनेत पाकिस्तानी ड्रामा अर्ध्या किमतीत होतात. पाकिस्तानी कलाकार प्रचंड भावनिक आहेत. आपलं काम जागतिक पातळीवर पाहिलं गेलं पाहिजे असं या कलाकारांना वाटतंय, असंही तिने म्हटलंय.
सोशल मीडियावर कमेंट्स
नादियाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर लोकांच्या प्रचंड कमेंट्सही येत आहे. एका यूजर्सने तर प्रत्येक इंडस्ट्रीत पॉलिटिक्स असतंच. मग तिथेही असणारच. पण तुम्ही तुमच्या गोष्टी लपवण्यासाठी सर्व काही भारतावर खापर फोडत आहात, असं म्हटलंय. तर दुसऱ्याने प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते, असं म्हटलंय.