Singer KK: अखेरच्या कॉन्सर्टमध्ये केकेनं गायली ‘ही’ 20 गाणी
या कॉन्सर्टमध्ये त्यांनी जवळपास 20 गाणी गायली होती. बॉलिवूड चित्रपटांमधील त्यांची गाजलेली गाणी त्यांनी तरुणांसमोर सादर केली होती. 1999 मध्ये ‘पल’ या म्युझिक अल्बमद्वारे केके यांची भारतीय संगीतप्रेमींना ओळख झाली होती. त्यातील ‘यारो, दोस्ती’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं.
बॉलिवूडमधील आघाडीचे गायक केके (KK) (कृष्णकुमार कुन्नथ) यांचं मंगळवारी रात्री उशिरा कोलकाता (Kolkata) इथल्या एका कार्यक्रमात हृदयविकाराने निधन झालं. अवघ्या 53व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केके यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. तरुणाईमध्ये त्यांची गाणी अत्यंत लोकप्रिय ठरली आहेत. कॉन्सर्टमध्ये (Concert) लाईव्ह परफॉर्म करताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. या कॉन्सर्टमध्ये त्यांनी जवळपास 20 गाणी गायली होती. बॉलिवूड चित्रपटांमधील त्यांची गाजलेली गाणी त्यांनी तरुणांसमोर सादर केली होती. 1999 मध्ये ‘पल’ या म्युझिक अल्बमद्वारे केके यांची भारतीय संगीतप्रेमींना ओळख झाली होती. त्यातील ‘यारो, दोस्ती’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. त्यांनी कॉन्सर्टमध्ये गायलेली वीस गाणी कोणती, ते पाहुयात..
-
- तू आशिकी है
- क्या मुझे प्यार है (वो लम्हें)
- दिल इबादत (तुम मिले)
- मेरे बिना (क्रूक)
- लबों को (भुल भुलैय्या)
- तू ही मेरी शब है (गँगस्टर)
- आंखो मे तेरी (ओम शांती ओम)
- अभी, अभी (जिस्म 2)
- मेरा पहला पहला प्यार है (MP3)
- तू जो मिला (बजरंगी भाईजान)
- यारों
- खुदा जाने (बचना ऐ हसिनों)
- जरा सी दिल में (जन्नत)
- आशाएँ (इक्बाल)
- मुझको पहचानलो (डॉन 2)
- तुने मारी एँट्रिया (गुंडे)
- मेक सम नॉईज फॉर द देसी बॉईज (देसी बॉईज)
- डिस्को
- कोई कहे कहता रहै (दिल चाहता है)
- प्यार के पल
केके यांच्या अखेरच्या कॉन्सर्टचे व्हिडीओ
प्रकृती बिघण्यापूर्वी रात्री 8.३० वाजेपर्यंत केके जवळपास 7000 प्रेक्षकांसमोर ही गाणी गात होते. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केलं. केके यांचं पार्थिव आज (बुधवार) रात्री 9 पर्यंत मुंबईत आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर मुंबईमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.