Parineeti-Raghav Engagement | राघव चड्ढा-परिणीती चोप्रा यांचा या खास पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार साखरपुडा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा हे दोघे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा हे दोघेसोबत स्पाॅट देखील होतात. मात्र, परिणीती असो किंवा राघव यांनी कायमच आपल्या नात्यावर भाष्य करणे टाळले आहे.
मुंबई : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे एकमेकांना डेट करत आहेत. मुंबईमध्ये यांना अनेकदा स्पाॅट केले गेले. मात्र, परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) किंवा राघव चड्ढा यांनी कधीच त्यांच्या नात्यावर भाष्य केले नाहीये. दोन दिवसांपूर्वीच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे जोडीने दिल्लीच्या दिशेने रवाना झाले. मुंबई विमानतळावर दोघांचाही लूक जबरदस्त दिसत होता. विमातळावरील परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे फोटो (Photo) पाहून असा अंदाजा लावला जात होता की, हे साखरपुड्यासाठी दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
विशेष म्हणजे उद्या परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा हा दिल्लीमध्ये पार पडणार आहे. रिपोर्टनुसार 150 लोकांच्या उपस्थितीमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. शेवटी उद्या तो दिवस आलाय.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला अनेक नेते आणि बाॅलिवूड कलाकार हजेरी लावणार आहेत. यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबची मुख्यमंत्री भगवंत मान, परिणीती चोप्रा हिची बहीण प्रियांका चोप्रा तसेच बाॅलिवूडचे अनेक कलाकार. आम आदमी पक्षाचे जवळपास सर्वच नेते या साखरपुड्यासाठी हजर असतील असे देखील सांगितले जात आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यानिमित्त खास थीम ठेवल्याचे देखील सांगितले जात आहे. मनीष मल्होत्रा याने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये परिणीती ही दिसणार असून राघव पवन सचदेवा याने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये दिसणार आहे. साखरपुड्याचा कार्यक्रम हा सायंकाळी पाच वाजता सुरू होणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.
सुखमनी साहिब यांचा पाठ देखील ठेवण्यात आलाय. त्यानंतर रात्री आठ वाजता साखरपुडा होईल आणि नंतर जेवण. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची पहिली भेट ही लंडनमध्ये झाल्याचे सांगितले जाते आणि तिथूनच त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरूवात झाली. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देणारी एक पोस्ट काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीच्या नेत्याने सोशल मीडियावर शेअर केली होती.