Parineeti Chopra | परिणीती चोप्रा हिची सुपारी फुटली, लवकरच या खासदारासोबत घेणार सात फेरे, चाहत्यांमध्ये उत्साह
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलीये. परिणीती चोप्रा हिचे नाव खासदार राघव चड्ढा याच्यासोबत जोडले जात आहे. हे दोघे कायमच स्पाॅट होतात. आता यांच्याबद्दल मोठी अपडेट पुढे आलीये.
मुंबई : आम आदमी पक्षाचा नेता आणि खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) हा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिच्यासोबत काही फोटो राघव चड्ढा याचे सुरूवातीला व्हायरल झाले आणि एकच चर्चांना उधाण फुटले. विशेष म्हणजे परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे सतत स्पाॅट होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून यांच्या लग्नाच्या चर्चा देखील जोर धरू लागल्या. राघव चड्ढा याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला की, परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही नेहमीच लाजताना दिसते. इतकेच नाही तर आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने काही दिवसांपूर्वी परिणीती आणि राघव यांना पुढील आयुष्यासाठी सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे लग्न ठरले आहे. अगदी गुपचूप पध्दतीने यांची सुपारी फोडलीये. विशेष म्हणजे यांच्या लग्नाबद्दल देखील मोठी अपडेट पुढे येतंय. चार महिन्यामध्ये हे लग्न करणार आहेत. परिणीती चोप्रा सध्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने लग्नाची तारीख ही चार महिन्यांनंतर काढण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. आता यांची सुपारी देखील फुटलीये. मात्र, यावर अजून राघव चड्ढा किंवा परिणीती चोप्रा यांच्याकडून काही माहिती दिली गेली नाहीये. रिपोर्टनुसार कुटुंबिय आणि काही जवळच्या लोकांच्या उपस्थितीमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या सुपारीचा कार्यक्रमा पार पडलाय.
काही दिवसांपूर्वी संसदेतून बाहेर आल्यानंतर राघव चड्ढा कारच्या दिशेने जात असताना काही पत्रकारांनी परिणीती चोप्रा हिच्यासोबतत्या नात्यावर प्रश्न विचारले. थेट एकाने विचारले की, परिणीतीसोबत लग्न करणार का? तेव्हा राघव चड्ढा हसत म्हणाले, तुम्ही मला राजकारणाबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल विचारू नका…परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
पहिल्यांदा यांना मुंबईमध्ये एका हाॅटेलबाहेर स्पाॅट केले गेले आणि तेंव्हापासूनच यांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा रंगत होत्या. विशेष म्हणजे चाहते देखील यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत, त्यामध्ये आता यांचे लग्न ठरल्याचे रिपोर्टमध्ये म्हटल्यापासून चाहत्यांमध्ये आनंद बघायला मिळतोय. अनेकांनी तर थेट राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांना शुभेच्छा देण्यासही सुरूवात केलीये.