Parineeti Chopra | लग्नाच्या चर्चांवर अखेर परिणीती चोप्रा हिने सोडले माैन, म्हणाली, तुम्ही लोक…
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. सतत परिणीती चोप्रा हिच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे चाहते देखील परिणीती चोप्रा हिच्या लग्नाची वाट पाहताना सतत दिसत आहेत. आता परिणीती चोप्रा हिने मोठे भाष्य केले आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मात्र, यावेळी परिणीती चोप्रा ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. आम आदमी पक्षाचा खासदार राघव चड्ढा (MP Raghav Chadha) आणि परिणीती चोप्रा हे लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे या दोघांना अनेकदा सोबतही स्पाॅट केले गेले आहे. सर्वात अगोदर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांना मुंबईमध्ये स्पाॅट गेले होते. इतकेच नाही तर आॅक्टोसबरमध्ये हे लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. आम आदमी पक्षाच्या एका नेत्याने सोशल मीडियावर (Social media) पोस्ट शेअर करत यांना पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या होत्या.
काही दिवसांपूर्वीच राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचा सुपारीचा कार्यक्रम झाल्याच्या चर्चा होत्या. इतकेच नाही तर यांच्या लग्नाची तारीखही फायनल झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले. लग्नाची खरेदी करतानाही अनेकदा परिणीती चोप्रा ही दिसलीये. गेल्या काही दिवसांपासून सतत यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत.
सध्या परिणीती चोप्रा हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. परिणीती चोप्रा हिचा हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. या फोटोमध्ये परिणीती चोप्रा ही पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. यानंतर पापाराझी हे परिणीती चोप्रा हिला विचारतात की, लग्न कधी आहे?
View this post on Instagram
पापाराझी यांच्या प्रश्नानंतर परिणीती चोप्रा ही लाजताना दिसली. पुढे पापाराझी म्हणतात की, आम्ही मुलीकडच्या बाजूने आहोत. लवकर सांगा लग्न कधी आहे ते म्हणजे आम्हाला कपडे शिवता येतील. यावर परिणीती चोप्रा म्हणाली की, तुम्ही लोक पागल झाला आहात. यानंतर धन्यवाद म्हणत तिथून जाताना परिणीती चोप्रा ही दिसत आहे.
आता सोशल मीडियावर परिणीती चोप्रा हिचा हाच व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. परिणीती चोप्रा हिच्या या व्हिडीओवर अनेकांनी लग्न कधी आहे हाच प्रश्न विचारला आहे. परिणीती चोप्रा हिचे चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून तिच्या लग्नाची वाट पाहताना दिसत आहेत. परिणीती चोप्रा ही सध्या विदेशात आहे. विदेशातील काही खास फोटो हे परिणीती चोप्रा हिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.