Photos | रिया चक्रवर्तीची मित्रांबरोबर पार्टी, दंगा आणि बरंच काही, सुशांतचे चाहते नाराज

सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सुशांतच्या मृत्यूला रियाच कारणीभूत आहे असा आरोप सुशांतच्या घरच्यांनी केला आहे.

Photos | रिया चक्रवर्तीची मित्रांबरोबर पार्टी, दंगा आणि बरंच काही, सुशांतचे चाहते नाराज
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 11:54 AM

मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) सुशांतच्या मृत्यूला रियाच कारणीभूत आहे असा आरोप सुशांतच्या घरच्यांनी केला आहे. त्यानंतर खरे आरोप -प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले. मात्र, यासर्व प्रकरणावेळी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर रियाच्या विरोधात रान पेटवले होते.  यासर्व प्रकारामुळे रिया मात्र, सोशल मीडियापासून दूर गेली आहे. सोशल मीडियावर रिया कुठलीही प्रतिक्रिया देत नाही किंवा मत ठेवत नाही. (Party with friends by Rhea Chakraborty)

या दरम्यान रियाने कोणत्याही पार्टी अथवा कार्यक्रमांना हजेरी लावणे देखील बंद केले होते. मात्र, आता रिया पार्टी करताना दिसली नुकताच रियाने राजीव लक्ष्मणसोबत पार्टी केली आहे. राजीव लक्ष्मणने मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत रिया देखील एन्जॉय करताना दिसत आहे. मात्र, आता रियाची ही पार्टी सुशांतच्या चाहत्यांना पचनी पडणार नाही. कारण सुशांतचे निधन होऊ एक वर्षही झाले नसताना रिया पार्टी करत आहे.

नुकताच राजीव लक्ष्मणने पार्टीतील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये रिया राजीवला मिठी मारताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना राजीवने लिहले आहे की, ‘माय गर्ल’ रिया लवकरच चित्रपटाद्वारे कमबॅक करणार आहे. रुमी जाफरीने एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत याबाबतची माहिती दिली होती. “हे वर्ष रियासाठी अत्यंत धक्कादायक ठरलं. हे वर्ष तर सर्वांसाठीच वाईट होतं.

मात्र, तिच्यासाठी हा धक्का खूप मोठा होता. एक मिडल क्लास कुटुंबाची मुलगी एक महिन्यापर्यंत तुरुंगात होती. त्यामुळे ती खूप खचली आहे. रुमी जाफरीने रियाला आश्वासन दिलंय की संपूर्ण इंडस्ट्री मोठ्या मनाने तिचं स्वागत करेल. त्यांनी सांगितलं की, “ते नुकतेच रियाला भेटले होते. ती यावेळी अत्यंत शांत होती. ती काहीही बोलली नाही. ज्या दुखातून ती गेली आहे, त्यानंतर तिच्यावर कुठलाही आरोप करणे चुकीचं आहे.

संबंधित बातम्या : 

Reaction | तैमूरला चक्क स्थळ आलं? करिनाची तगडी प्रतिक्रिया!

ना नावात कपूर ना खान, तरीही बॉलीवूडमध्ये दाणादाण, वाचा केजीएफ स्टारची प्रेरणादायी गोष्ट!

(Party with friends by Rhea Chakraborty)

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.