रिलीजच्या पहिल्याच सोमवारी पठाण चित्रपटाची जादू गुल? KGF 2 याच्यासह या डझनभर चित्रपटांचा रेकाॅर्ड तोडण्यात शाहरुख खानच्या चित्रपटाला अपयश

पठाण चित्रपटाच्या रिलीजकडे सर्वांच्या नजरा लागल्या. देशामधील अनेक ठिकाणी पठाण चित्रपटाच्या विरोधात आंदोलने देखील करण्यात आली.

रिलीजच्या पहिल्याच सोमवारी पठाण चित्रपटाची जादू गुल? KGF 2 याच्यासह या डझनभर चित्रपटांचा रेकाॅर्ड तोडण्यात शाहरुख खानच्या चित्रपटाला अपयश
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 10:50 PM

मुंबई : बाॅलिवूडचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर करताना दिसत आहे. मुळात म्हणजे पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर कोणीच विचार केला नसेल की, हा चित्रपट एवढा जास्त धमाका बाॅक्स आॅफिसवर करेल. कारण पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वादाला तोंड फुटले होते. हिंदू लोकांच्या भावना पठाण चित्रपटामुळे दुखावल्याचा आरोपही करण्यात आला. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस अगोदर बजरंग दल आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले होते. इतकेच नाही तर पुण्यातील एका थिएटर बाहेर पठाण चित्रपटाचे लावलेले मोठे बॅनरही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी काढून टाकले. दुसरीकडे मुंबईमध्ये बजरंग दलाने थेट पठाण चित्रपटाच्या संदर्भात थिएटर मालकांनाच नोटीसा पाठवल्या होत्या. यामुळे पठाण चित्रपटाच्या रिलीजकडे सर्वांच्या नजरा लागल्या. देशामधील अनेक ठिकाणी पठाण चित्रपटाच्या विरोधात आंदोलने देखील करण्यात आली.

पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा हंगामा बघायला मिळत होता. मात्र, प्रत्यक्षात पठाण हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर वेगळीच हवा निर्माण झाली. प्रेक्षकांमध्ये पठाण चित्रपटाचे मोठे क्रेझ बघायला मिळाले. मुळात म्हणजे कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर सतत फ्लाॅप जात होते.

पठाण चित्रपटाच्या माध्यमातून अनेक वर्षांनंतर एखाद्या बाॅलिवूड चित्रपटाच्या वेळी चाहते थिएटरमध्ये डान्स करताना दिसले. बाॅलिवूडचे चित्रपट एका मागून एक फ्लाॅप जात असल्याने मोठी टीका बाॅलिवूडवर करण्यात आली होती. अनेकांनी थेट बाॅलिवूडकडे चांगल्या स्टोरीच राहिल्या नसल्याचे म्हटले होते.

एकीकडे बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात होते. तर दुसरीकडे मात्र, साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करत होते. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने एकप्रकारे बाॅलिवूडचा संजीवनीच मिळालीये. आतापर्यंत पठाण चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर नोंदवले आहेत.

पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. सहा दिवस चित्रपट रिलीज होऊन झाले आहेत. पठाण चित्रपटाने सोमवारी बाॅक्स आॅफिसवर २५ कोटींचे कलेक्शन केले आहे. इतर दिवसांच्या तुलनेत हा आकडा अत्यंत कमी असल्याचे दिसत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर हा पहिला सोमवार होता.

पठाण चित्रपट जरी अनेक रेकाॅर्ड तोडत असला तरीही सोमवारच्या कमी बाॅक्स आॅफिस कलेक्शनमुळे मोठा फटका बसला आहे. कारण इतर चित्रपटांनी यापूर्वी पहिल्या सोमवारी पठाण चित्रपटापेक्षा अधिक कमाई केलेली आहे. यामध्ये KGF २ देखील पठाण चित्रपटापेक्षा खूप पुढे आहे.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर पहिल्या सोमवारी बाहुबली २ या चित्रपटाने ४०.२५ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले होते. टाइगर जिंदा है ३६.५४ कोटी, हाउसफुल ४ या चित्रपटाने ३४.५६ कोटी, बजरंगी भाईजान २७.०५, केजीएफ 2 २५.५७ कोटी, संजू २५. ३५ कोटी, दंगल २५.१४ कोटी आणि पठाण चित्रपटाने २५ कोटी कमाई केलीये. यामुळे पठाण चित्रपट हे रेकाॅर्ड तोडू शकला नाहीये.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.