Pathaan | तीन दिवसांमध्ये पठाण चित्रपटाची बंपर कमाई, विकेंडला होणार अधिक फायदा

अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. इतकेच नाहीतर सोशल मीडियावर सतत बॉयकॉट पठाण ट्रेंड देखील सुरू होता.

Pathaan | तीन दिवसांमध्ये पठाण चित्रपटाची बंपर कमाई, विकेंडला होणार अधिक फायदा
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 5:51 PM

मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर धमाका केलाय. बाॅलिवूडमधील अनेक रेकाॅर्ड पठाण चित्रपट आपल्या नावावर करतोय. शाहरुख खान (Shah Rukh Khan याने दणदणीत असे पुनरागमन नक्कीच केलंय. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद (Dispute) सुरू झाला. अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली. इतकेच नाहीतर सोशल मीडियावर सतत बॉयकॉट पठाण ट्रेंड देखील सुरू होता. यामुळे अनेकांना वाटले होते की, इतर बाॅलिवूडच्या (Bollywood) चित्रपटांप्रमाणेच पठाण हा चित्रपट देखील फ्लाॅप जाईल. प्रत्यक्षात सर्वकाही उलटे झाले आणि चित्रपटाने बाॅक्स आॅफिस आॅफिसवर धमाका केला आहे. चित्रपटाचा ओपनिंग डेही जबरदस्त ठरला.

पठाण चित्रपट रिलीज होऊन तीन दिवस उलटले आहेत. चित्रपट सुसाट अशी कामगिरी करतोय. 123 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन पठाण चित्रपटाने केले आहे. प्रेक्षकांचे प्रेम पठाण चित्रपटाला मिळत आहे.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर एक ट्विट करून पठाण चित्रपटाच्या बाॅक्स आॅफिस कलेक्शनची माहिती शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी चित्रपटाचे तीन दिवसांचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन सांगितले आहे.

अंदाजे पठाण चित्रपटाने तीन दिवसांमध्ये १२३ कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केल्याचे तरण आदर्श यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पठाण चित्रपटाला विकेंडचा फायदा देखील होऊ शकतो.

शनिवार आणि रविवार बाॅक्स आॅफिस कलेक्शनमध्ये अजून वाढ होऊ शकते. पठाण चित्रपटाची जेवढी चर्चा होती, त्यापेक्षाही अधिक कमाई ही पठाण चित्रपटाने नक्कीच केलीये.

पठाण चित्रपटाची शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ दिसत आहे. सुरूवातीला या चित्रपटाच्या प्रचंड विरोध करण्यात आला. मात्र, आता या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. फक्त भारतामध्येच नाहीतर इतरही देशामध्ये चित्रपट धमाल करतोय.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.