Pathaan | तिसऱ्याच दिवशी पठाण चित्रपटाची बाॅक्स ऑफिसवर हवा गुल? इतक्या कोटींचे कलेक्शन

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने सुरूवातीचे दोन दिवस बाॅक्स ऑफिस कलेक्शनमध्ये बाजी मारली. अनेक रेकाॅर्ड पठाण चित्रपटाने आपल्या नावावर करून टाकले.

Pathaan | तिसऱ्याच दिवशी पठाण चित्रपटाची बाॅक्स ऑफिसवर हवा गुल? इतक्या कोटींचे कलेक्शन
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 2:28 PM

मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण (Pathaan) चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट सतत वादामध्ये असल्याने याचा फटका चित्रपटाला बसेल अस एक अंदाजा होता. मात्र, सर्वकाही उलटे झाले आणि संपूर्ण वादाचा फायदा हा पठाण चित्रपटाला झाला. पठाण चित्रपटाच्या विरोधात बजरंग दल आक्रमक झाल्याचे सुरूवातीला बघायला मिळाले. परंतू सुरूवातीपासूनच पठाण या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. यामुळे शाहरुख खान आणि त्याच्या चाहत्यांसाठी पठाण हा अत्यंत खास चित्रपट होता. सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट (Movie) रिलीज झाल्यानंतर फक्त आणि फक्त पठाण चित्रपटाचीच हवा बघायला मिळाली.

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने सुरूवातीचे दोन दिवस बाॅक्स ऑफिस कलेक्शनमध्ये बाजी मारली. इतकेच नाहीतर अनेक रेकाॅर्ड पठाण चित्रपटाने आपल्या नावावर करून टाकले.

सुरूवातीचे दोन दिवस चित्रपटाने धमाल केल्यानंतर तिसऱ्या दिवशीही चित्रपट सुसाट बाॅक्स आॅफिसवर कमाई करेल असा एक अंदाजा होता. परंतू प्रत्यक्षात तसे झाले नसून चित्रपटासाठी तिसरा दिवस फार काही खास ठरला नाहीये.

पठाण चित्रपटाने दोन दिवस अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले. यामुळे तिसऱ्या दिवशी धमाका होईल, अशी अपेक्षा होती. परंतू तिसऱ्या दिवशी पठाण चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे बाॅक्स ऑफिस कलेक्शनवरून पुढे आले आहे.

ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला याच्या रिपोर्टनुसार तिसऱ्या दिवशी भारतामध्ये पठाण या चित्रपटाने 34 ते 36 कोटींचे बाॅक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत हे कमी आहे.

तिसऱ्या दिवशी बाॅक्स ऑफिस कलेक्शनमध्ये पठाण हा चित्रपट बाहुबली 2, केजीएफ 2 आणि दंगल या चित्रपटांचे रेकाॅर्ड तोडून शकला नाहीये. मात्र, विकेंडच्या दोन दिवसांमध्ये चित्रपटाची कमाई वाढण्याची शक्यता आहे.

पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने बिकिनी घातल्याने अनेकांनी गंभीर आरोप केले होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.