शाहरुख खान आणि सलमान खान यांचा थेट प्रश्न, ट्रोलर्सला डिवचले, आमची जागा कोण…

या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण हे मुख्य भूमिकेत असून सर्वांचा आवडता भाईजान अर्थात सलमान खान याचा देखील केमिओ चित्रपटामध्ये आहे.

शाहरुख खान आणि सलमान खान यांचा थेट प्रश्न, ट्रोलर्सला डिवचले, आमची जागा कोण...
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 3:54 PM

मुंबई : शाहरुख खान याने पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून दणदणीत पुनरागमन केले आहे. पठाण चित्रपट (Movie) रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद सुरू होता. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर बाॅक्स आॅफिसवर मोठा धमाका होताना दिसत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरमध्ये आणण्यास यशस्वी नक्कीच ठरलाय. चित्रपटाचे शो हाऊसफुल जात असून प्रेक्षकांना तिकिटे देखील मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे. सुरूवातीला पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने सोशल मीडियावर केली जात होती. परंतू चित्रपट रिलीज झाल्यानंतर फक्त आणि फक्त पठाण चित्रपटाचीच हवा बघायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण हे मुख्य भूमिकेत असून सर्वांचा आवडता भाईजान अर्थात सलमान खान याचा देखील केमिओ चित्रपटामध्ये आहे.

गेल्या काही दिवसांपासून विशेष: कोरोनानंतरच्या काळापासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करू शकत नव्हते. एका मागून एक असे बिग बजेटचे चित्रपट फ्लाॅप जात होते.

अक्षय कुमार, आमिर खान, रणबीर कपूर, रणवीर सिंह, कतरिना कैफ अशा मोठ्या स्टारर्सचे चित्रपट देखील फ्लाॅप गेले. यामुळे बाॅलिवूड चित्रपटांवर टीका सातत्याने केली जात होती.

इतकेच नाहीतर अनेकांनी थेट बाॅलिवूडकडे चांगल्या स्टोरीच राहिल्या असल्याचा आरोप केला होता. मोठ्या मोठ्या स्टारर्सचे चित्रपट फ्लाॅप जात असल्याने बाॅलिवूडवर टीका वाढली होती.

बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असतानाच दुसरीकडे साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करत होते. आता बाॅलिवूडचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसतोय.

पठाण चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान आणि शाहरुख खान यांनी एक मोठा मेसेज दिल्याचे दिसत आहे. चित्रपटाच्या शेवटी पठाण आणि टायगर मनातील गोष्ट सांगताना दिसत आहे.

पठाण हा टायगरला सांगतो की, मी कधी कधी विचार करतो की, ३० वर्ष झाले आहेत हे सर्व थांबवायला हवे. यावर टायगर म्हणतो, परंतू आपली जागा कोण घेणार? पुढे पठाण म्हणतो, आपल्यालाच करावे लागणार आहे भाई…देशाचा प्रश्न आहे…लेकरांवर सोडू शकत नाही…

सलमान खान आणि शाहरुख खान यांचे हे संभाषण जरी चित्रपटामधील असले तरीही हे व्हायरल होताना दिसत असून यांना नेमका कोणाला इशारा द्यायचा याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.