मुंबई : सर्वत्र शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या पठाण चित्रपटाची चर्चा होताना दिसत आहे. पठाण हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाने ओपनिंग डेलाच मोठा धमाका केलाय. शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. पठाण (Pathaan) चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ होती. विशेष म्हणजे फक्त भारतामध्येच नाहीतर संपूर्ण जगभरामधून या चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. मात्र, असे असले तरीही आरआरआर चित्रपटाचा रेकाॅर्ड मोडण्यात पठाण चित्रपटाला अपयश मिळाले. चार वर्षांनंतर शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून पुनरागमन केले आहे. २०१९ मध्ये शेवटी शाहरुख खान हा झिरो या चित्रपटामध्ये दिसला होता. पठाण या चित्रपटानंतर शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पठाण या चित्रपटाने ओपनिंग डेला बाॅक्स आॅफिसवर धमाका करत जबरदस्त ओपनिंग केलीये.
कोरोनानंतर बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसर धमाका करू शकत नव्हते. आमिर खान, अक्षय कुमार रणवीर सिंह यांचे देखील चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले. रणवीर सिंह याचे तर एका मागून एक असे तीन चित्रपट फ्लाॅप गेले आहेत.
एकीकडे बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते. तर दुसरीकडे मात्र, साऊथचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत होते. यादरम्यान अनेकांनी बाॅलिवूडच्या चित्रपटांवर टीका करण्यासही सुरूवात केलीये. मात्र, आता शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने सर्वांची बोलती बंद केलीये.
शाहरुख खान याने पठाणच्या माध्यमातून चार वर्षांनंतर पुनरागमन केल्याने त्याच्यासाठी देखील हा चित्रपट अत्यंत खास आहे. नुकताच शाहरुख खान याची लाडकी लेक सुहाना खान हिने पठाण चित्रपटासंदर्भात एक भावनिक पोस्ट शेअर केलीये.
सुहाना खान हिने इंस्टा स्टोरीवर पूजा ददलानी हिची पोस्ट रिशेअर केलीये. ही पोस्ट रिशेअर करताना तिने खास कॅप्शन देखील दिले आहे. यामध्ये तिने डोळ्यांमध्ये अश्रू असलेला एक इमोजी शेअर केलाय. पूजा ददलानी हिच्या पोस्टमध्ये पठाण चित्रपटाचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन शेअर करण्यात आले होते. ही पोस्ट शेअर करताना सुहाना खान इमोशन झाल्याचे दिसत आहे.
पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर फक्त दोन दिवसांमध्ये तब्बल 122 कोटींचे कलेक्शन केले आहे. विशेष म्हणजे पठाण या चित्रपटाने एक मोठा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला असून बाॅलिवूडच्या आतापर्यंतच्या सर्वात ओपनिंग कलेक्शन जास्त करणारा पठाण चित्रपट ठरला आहे.