कठीणकाळात मदतीचा हात, कृतज्ञता म्हणून उभारले चक्क सोनू सूदचे मंदिर!

कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती.

कठीणकाळात मदतीचा हात, कृतज्ञता म्हणून उभारले चक्क सोनू सूदचे मंदिर!
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 11:51 AM

मुंबई : कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दुर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. अशावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रस्तावर उतरून लोकांची मदत करत होता.(People built the temple of Sonu Sood in the state of Telangana)

त्याने लोकांना त्यांच्या गावी परतण्यासाठी गाड्यांची व्यवस्था असो किंवा त्यांच्या जेवण्याची असो अशी प्रत्येक प्रकारची मदत त्याने लोकांना केली होती. त्याचप्रमाणे सोनू सूदने शासनाच्या कुठल्याही मदती शिवाय गावांमध्ये रस्ते तयार केले.

त्याच्या या सर्व कार्यासाठी तेलंगणातील सिद्दीपेट जिल्हातील डब्बा टांडागावातील लोकांनी सोनू सूदला समर्पित मंदिर बांधले आहे. या मंदिराचे रविवारी ग्रामस्थांनी उद्घाटन केले. यावेळी सोनू सूदची आरती करण्यात आली. महिलांनी पारंपरिक वेषभूषा करून गाणे देखील म्हणले. जिल्हा परिषद सदस्य गिरी कोंडल रेड्डी म्हणाले की, कोरोनो व्हायरसच्या काळात सोनू सूदने जनतेसाठी मोठे काम केले.

ज्यावेळी कोणी मदत करत नव्हते, अशावेळी तो सर्वांच्या मदतीला धावून आला, त्यांच्या या चांगल्या कामामुळे आम्ही त्याला देवाचे स्थान दिले आहे आणि सोनू सूदसाठी एक मंदिर बांधले आहे. याबद्दल रमेश कुमार म्हणाले की, सूदने देशातील 28 राज्यांतील लोकांची मदत केली. आणि कोरोना काळात लॉकडाउनपासून सोनू सूद ज्या प्रकारे लोकांना मदत केली त्यानंतर केवळ भारतातच नाही तर जगानेही त्याला ओळखले आहे.

अलीकडेच सोनू सूदला संयुक्त राष्ट्राकडून एसडीजीचा विशेष मानवतावादी कृती पुरस्कार मिळाला. म्हणून गावातील लोकांनी त्याचे मंदिर बांधण्याचे ठरविले. कोरोना काळात स्थलांतरितांसाठी आधार म्हणून आलेल्या बॉलीवूड अभिनेता सोनू सूदच्या उदारपणाची प्रत्येकजण स्तुती करीत आहे. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांनीही त्याला देवाचा दर्जा दिला आहे.

संबंधित बातम्या :

दोन दुकाने, सहा फ्लॅट गहाण ठेवून गरिबांना मदत; गरजवंतांच्या मदतीसाठी सोनू सूदने घेतलं 10 कोटींचं कर्ज

बैलांच्या जागेवर मुलींना जुंपून शेत नांगरलं, सोनू सूदकडून शेतकऱ्याला घरपोच ट्रॅक्टर

Sonu Sood | पंजाबचा ‘स्टेट आयकॉन’, अभिनेता सोनू सूदच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

(People built the temple of Sonu Sood in the state of Telangana)

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.