मुंबई : उर्फी जावेद कायमच तिच्या हटके कपड्यांसाठी ओळखली जाते. अनेकदा उर्फीला तिच्या कपड्यांमुळे टीकेचा सामना देखील करावा लागतो. इतकेच नाही तर अतरंगी कपड्यांसाठी उर्फी जावेद (Uorfi Javed) हिला थेट बलात्कार करून जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात. मुळात म्हणजे उर्फी कधी काय करेल याचा अजिबातच नेम नाहीये. उर्फी जावेद हिला खरी ओळख बिग बाॅस (Bigg Boss) ओटीटीमधून मिळालीये. यापूर्वी उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. कायमच सोशल मीडियावर उर्फीचे बोल्ड फोटो व्हायरल होतात. विशेष म्हणजे उर्फी जावेद हिच्या फोटोंना मोठ्या प्रमाणात लाईक केले जाते. सोशल मीडियावर उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही मोठा आहे. काही दिवसांपूर्वीच उर्फी जावेद हिने टाॅप न घालता हातामध्ये नाश्त्याची प्लेट घेत एक फोटोशूट केले होते. उर्फी जावेद हिचे हे फोटोशूट (Photoshoot) पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.
आता परत एकदा उर्फी जावेद ही तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत आलीये. उर्फी जावेद हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने अतरंगी कपडे घातले आहेत.
व्हिडीओमध्ये उर्फी जावेद ही म्हणताना दिसत आहे की, मागच्या वेळी खूप जास्तच झाकले होते, त्यामुळे यावेळी त्याची भरपाई करत असल्याचे व्हिडीओमध्ये म्हणताना उर्फी जावेद ही दिसत आहे.
उर्फी जावदे पुढे म्हणाली की, या लूकबद्दल मी काय बोलू… तुम्हीच बघा…उर्फीचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
ब्लॅक कटआउट बॉडी सूटमध्ये उर्फी जावेद दिसत आहे. उर्फीने त्याच्यावर सी-थ्रू ब्लू स्कर्ट घातला आहे. या स्कर्टमध्ये तिचा टॉप दिसत आहे. दरवेळी प्रमाणे यावेळीही उर्फीने हटके कपड्यांची स्टाईल केल्याचे दिसत आहे.
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिला तिथे भेटले तिथे थोपटून काढण्याची भाषा केली होती. चित्रा वाघ यांना उर्फी जावेद हिने सडेतोड उत्तर दिले होते.
उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची असून करिअरसाठी ती मुंबईमध्ये दाखल झाली होती. आतापर्यंत उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सध्या उर्फी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते.