पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘द कश्मीर फाईल्स’ टीमची भेट, मोदींनाही भावला सिनेमा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 'द कश्मीर फाईल्स'ची टीम यांच्यात भेट झाली आहे. या भेटीचे फोटो दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी ट्विट केले आहेत.

मुंबई : ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files Movie) हा चित्रपट सध्या अनेकांची मनं जिंकतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाहा हा सिनेमा आवडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘द कश्मीर फाईल्स’ची टीम यांच्यात भेट झाली आहे. या भेटीचे फोटो दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आणि निर्माते अभिषेक अग्रवाल (Abhishek Agrawal) यांनी ट्विट केले आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला सिनेमा आवडल्याचं म्हटलं. तसंच सगळ्या टीमचं कौतुकही केलं. तसंच कश्मीरी पंडितांच्या प्रश्नांवरही यावेळी चर्चा झाली. यावेळी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीदेखील (Pallavi Joshi) उपस्थित होत्या. तसंच या सिनेमाचे निर्माते अभिषेक अग्रवालही होते.
‘द कश्मीर फाईल्स‘ आणि पंतप्रधान यांच्यात भेट
‘द कश्मीर फाईल्स‘ या सिनेमावर अनेकजण बोलताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘द कश्मीर फाईल्स’ची टीम यांच्यात भेट झाली आहे. या भेटीचे फोटो दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माते अभिषेक अग्रवाल यांनी ट्विट केले आहेत. या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला सिनेमा आवडल्याचं म्हटलं. तसंच सगळ्या टीमचं कौतुकही केलं. यावेळी मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीदेखील उपस्थित होत्या.
विवेक अग्नीहोत्री यांचं ट्विट
पंतप्रधानांसोबतच्या भेटीविषयी विवेक अग्नीहोत्री यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी निर्माते अभिषेक अग्रवाल यांचं कौतुक केलं आहे. अश्या प्रकारच्या प्रश्नावर सिनेमा केल्याबद्दल अभिनंदन. या सिनेमाचं परदेशी स्क्रिनिगं झाल्याबद्दल आनंद असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
I am so glad for you @AbhishekOfficl you have shown the courage to produce the most challenging truth of Bharat. #TheKashmirFiles screenings in USA proved the changing mood of the world in the leadership of @narendramodi https://t.co/uraoaYR9L9
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 12, 2022
हा सिनेमा 11 मार्चला रिलीज झाला. याआधी हा चित्रपट मागच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे.
चित्रपटातील कलाकार
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट आजपासून प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळतेय.
संबंधित बातम्या