“ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता..”; ‘द काश्मीर फाईल्स’विषयी मोदींचं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी जमलेल्या सर्वांना ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट पाहण्यास सांगितलं. "हा खूप चांगला चित्रपट असून असे चित्रपट आणखी व्हायला हवेत," असं ते म्हणाले.

ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता..; 'द काश्मीर फाईल्स'विषयी मोदींचं वक्तव्य
PM Modi on The Kashmir FilesImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 7:33 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीसाठी जमलेल्या सर्वांना ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट पाहण्यास सांगितलं. “हा खूप चांगला चित्रपट असून असे चित्रपट आणखी व्हायला हवेत,” असं ते म्हणाले. विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचं घर सोडावं लागलं होतं. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत इतरही काही नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 मार्च रोजी, दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री, त्यांची पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी आणि चित्रपटाचे निर्माते अभिषेक यांच्यासह चित्रपटाच्या टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी मोदींनी त्यांचं अभिनंदन करत चित्रपटाचं कौतुक केलं होतं.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“द काश्मीर फाईल्स हा खूप चांगला चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी तो पाहावा. असे चित्रपट आणखी बनवले गेले पाहिजेत. अशा चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना सत्य कळतं आणि भूतकाळात घडलेल्या घटनांना कोण जबाबदार होते हेदेखील समजतं. कोणी शोषण केलं किंवा कोणी चांगलं काम केलं हे सांगण्याचा प्रयत्न यांसारखे चित्रपट करतात”, अशा शब्दांत मोदींनी कौतुक केलं. ज्यांनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तेच आता चित्रपटाला विरोध करत आहेत, असंदेखील ते म्हणाले.

भाजपशासित राज्यात ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री करण्याची चढाओढ

द काश्मीर फाईल्स हा चित्रपट उत्तरप्रदेश, गुजराज, हरयाणा, कर्नाटक, त्रिपुरा, उत्तराखंड या राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये सिनेमाला टॅक्स फ्री करण्याची मागणी करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये भाजपसोबतच काँग्रेसच्या आमदारांनीही चित्रपटाला टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा:

कपिल शर्माने ‘द काश्मीर फाईल्स’ला प्रमोट करण्यास दिला नकार? अनुपम खेर यांनी सांगितलं सत्य

प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘द काश्मीर फाईल्स’मधील ‘या’ सीनवर लागली कात्री

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.