Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wedding : आलियाच्या लग्नानंतर भावूक झालेल्या महेश भट्ट यांनी जावई रणबीरला मारली मिठी, पाहा खास फोटो!

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात होते. आलिया आणि रणबीर कपूर अखेर 14 एप्रिल रोजी लग्नबंधण्यात अडकले. रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फोटो (Photo) आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Wedding : आलियाच्या लग्नानंतर भावूक झालेल्या महेश भट्ट यांनी जावई रणबीरला मारली मिठी, पाहा खास फोटो!
महेश भट्ट यांनी जावयाला मिठी मारलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 12:56 PM

मुंबई : आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात होते. आलिया आणि रणबीर कपूर अखेर 14 एप्रिल रोजी लग्नबंधण्यात अडकले. रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे फोटो (Photo) आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नामधील रणबीर आणि आलियाचा खास लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. आलियाचे वडिल महेश भट्ट यांचेही काही फोटो सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोमध्ये महेश भट्ट अतिशय भावनिक झाल्याचे दिसत आहेत. मुलीच्या लग्नामध्ये बापाच्या चेहऱ्यावर जी काळजी असते, तिच काळजी महेश भट्ट यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत.

महेश भट्ट यांनी रणबीरला मारली मिठी

पूजा भट्टने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामधील एका फोटोमध्ये दिसते आहे की, महेश भट्ट हे जावई रणबीर कपूरला मिट्टी मारत आहेत. रणबीर आणि महेश भट्ट यांचा हा फोटो लग्नाच्यानंतरचा आहे असे सांगितले जात आहे. आलियाची बहिण पूजा भट्ट्ने हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, मनापासून ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता असते तेव्हा शब्दांची गरज नसते. पूजाच्या पोस्टवर चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि लग्नाच्या सुंदर क्षणांमध्ये हे फोटो सर्वात भारी असल्याचे सांगत आहेत.

इथे पाहा पूजा भट्ट्ने शेअर केलेले फोटो

View this post on Instagram

A post shared by Pooja B (@poojab1972)

लग्नाच्या अगोदरही पूजा भट्टने महेश भट्ट यांचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये महेश भट्ट यांच्या दोन्ही हातांवर मेहंदी दिसते आहे. विशेष म्हणजे महेश भट्ट यांच्या दोन्ही हातांवर आलिया आणि रणबीरचे नाव लिहिलेले आहे. कपूर आणि भट्ट कुटुंबीय गुरुवारी सकाळीच रणबीरच्या बंगल्यात हजर झाले होते. करीना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, आलिया भट्टची आई सोनी राजदान, मावशी, वडील महेश भट्ट, आलियाच्या बहिणी शाहिन भट्ट आणि पूजा भट्ट, आकाश आणि श्लोका अंबानी, निर्माता-दिग्दर्शक करण जोहर अशी अनेक मंडळी या लग्नसोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होती.

संबंधित बातम्या : 

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding: अशी असावी सासू, असा असावा मेव्हुणा! रणवीरला सासूकडून 2.5 कोटींचे घड्याळ तर मेव्हुण्याकडून 1 लाखाचा लिफाफा गिफ्ट

KGF Chapter 2 Box Office Collection: ‘केजीएफ 2’ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई; यशने स्वत:च्याच चित्रपटाचा मोडला विक्रम

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.