मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पूजा हेगडे आणि सलमान खान याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट किसी का भाई किसी की जान हा 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे शहनाज गिल ही देखील या चित्रपटाच्या माध्यमातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटातील अनेक गाणे आतापर्यंत रिलीज झाले असून सलमान खान (Salman Khan) याचा लूकही प्रेक्षकांना प्रचंड आवडलाय. किसी का भाई किसी की जान या चित्रपटात सलमान खान याच्यासोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत एक चर्चा सुरू आहे की, सलमान खान आणि पूजा हेगडे हे एकमेकांना डेट करत आहेत. इतकेच नाही तर पूजा हेगडे हिच्या भावाच्या लग्नाला सलमान खान याने हजेरी लावली होती. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. मात्र, एका मुलाखतीमध्ये पूजा हेगडे हिने सलमान खान याच्यासोबत असलेल्या रिलेशनवर स्पष्ट भाष्य केले.
पूजा हेगडे हिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, मला सध्या सिंगल आहे. कारण मला सध्या माझ्या करिअरवर पूर्णपणे लक्ष द्यायचे आहे. मला एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करायचा आहे. त्यामुळे मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आहे. आता एका दुसऱ्या चर्चेमुळे पूजा हेगडे ही चर्चेत आहे.
गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सातत्याने रंगत आहे की, पूजा हेगडे हिला चित्रपट निर्मात्याने एक आलिशान कार भेट दिलीये. सतत यावर जोरदार चर्चा सुरू आहेत. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पूजा हेगडे हिने यावर भाष्य केले आहे. पूजा हेगडे म्हणाली की, गेल्या काही दिवसांपासून माझ्याबद्दल अनेक अफवा सुरू आहेत. मात्र, मी प्रत्येक गोष्टीला नक्कीच उत्तर देऊ शकत नाही.
पूजा हेगडे हिला विचारण्यात आले की, तुला चित्रपट निर्मात्याने महागडी कार गिफ्ट दिल्याची चर्चा आहे, हे खरे आहे का? यावर पूजा म्हणाली, मी आलिशान कार गिफ्ट दिली याचा एक स्क्रीनशॉट चित्रपट निर्मात्याला पाठवला आणि त्यांना म्हणाले की, अशी अफवा सुरू आहे मग तुम्ही मला खरंच कार गिफ्ट करा. मुळात म्हणजे काही दिवसांपासून अनेक अफवा माझ्याबद्दल पसरवल्या जात आहेत.