सुशांत सिंह राजपूतचा केंद्र सरकार सन्मान करणार; नॅशनल अ‍ॅवार्डला सुशांतचे नाव देण्याचा विचार सुरू!

सुशांत सिंह राजपूतचे (Sushant Singh Rajput) 9 महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला होता.

सुशांत सिंह राजपूतचा केंद्र सरकार सन्मान करणार; नॅशनल अ‍ॅवार्डला सुशांतचे नाव देण्याचा विचार सुरू!
सुशांतसिंह राजपूत
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 4:00 PM

मुंबई : सुशांत सिंह राजपूतचे (Sushant Singh Rajput) 9 महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला होता. सध्या एक चर्चा सर्वत्र आहे की, केंद्र सरकार एका नॅशनल अवॉर्डला सुशांत सिंह राजपूतचे नाव देण्याच्या तयारीत आहे. सुशांतचे निधन झाल्यानंतर त्याचा एक बायॉपिक तयार करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्याचे पुढे काय झाले हे अद्याप कळू शकले नाही. (Possibility of giving National Award in the name of ‘Sushant Singh Rajput’)

केंद्र सरकार नेमक्या कुठल्या अवॉर्डला सुशांतचे नाव देणार हे अद्याप समजू शकले नाही. 4 जून रोजी सुशांत सिंह राजपूत त्याच्या मुंबईच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूत मृत्यू ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. रिया जवळपास 1 महिना तुरूंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने रियाला जामीन मंजूर केला होता.

स्टार प्लसवर ‘किस देश मे है मेरा दिल’ मालिकेतून 2008 मध्ये टीव्ही क्षेत्रात सुशांतने पदार्पण केलं होतं. त्यानंतर झी टीव्हीवर ‘पवित्र रिश्ता’ मालिका प्रचंड गाजली होती. पवित्र रिश्ता मालिकेतील सहअभिनेत्री अंकिता लोखंडे सोबत सुशांतची जोडी अत्यंत लोकप्रिय ठरली होती. सुशांत आणि अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.

मात्र, दोन वर्षांपूर्वी दोघं विभक्त झाले होते. 2013 मध्ये ‘काय पो छे’ चित्रपटातून सुशांतने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. त्यानंतर शुद्ध देसी रोमान्स, डिटेक्टीव्ह ब्योमकेश बक्षी, पीके असे सिनेमे गाजले. एम एस धोनी चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. या भूमिकेने तो यशोशिखरावर पोहोचला.

संबंधित बातम्या :

Video : सोनू सूदने उघडला ढाबा, खवय्यांना दिलं आवतन; म्हणाला…

सैफ-करीनाच्या बाळाचं नाव काय असेल?; रणधीर कपूर म्हणतात…

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर बॉबी देओलने शेअर केला फोटो!

(Possibility of giving National Award in the name of ‘Sushant Singh Rajput’)

' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.