Sooryavanshi | रोहित शेट्टीला सूर्यवंशी चित्रपटाची रिलीज तारीख सुचेना!

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Sooryavanshi | रोहित शेट्टीला सूर्यवंशी चित्रपटाची रिलीज तारीख सुचेना!
Follow us
| Updated on: Jan 26, 2021 | 4:16 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपटाची चाहत्याते आतुरतेने वाट पाहत आहेत. अक्षय कुमारसोबत या चित्रपटात कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय अजय देवगन आणि रणवीर सिंहही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. आता या चित्रपटाशी संबंधित आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, रोहित शेट्टी पुन्हा एकदा चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. सध्या 50 टक्के क्षमतेसह चित्रपटगृहांत चित्रपट प्रदर्शित करणे सुरू आहे. (Possibility to change the date of Akshay Kumar’s Sooryavanshi movie)

यामुळे चित्रपट प्रदर्शित करणे शक्य नसल्याचे रोहित शेट्टी वाटते. या परिस्थितीत हा चित्रपट जून-जुलैमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, या रोहित शेट्टीच्या निर्णयाशी अक्षय कुमार सहमत नाहीये. चित्रपटाचे टीझर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीज झाले होते. 24 मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, कोरोनामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आली होती. सिंबा चित्रपटानंतर अक्षयने सूर्यवंशी या चित्रपटाची घोषणा केली होती. सिंबा चित्रपटातही अक्षय कुमारने काम केलं आहे. सिंबा चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. सिंबा हा 2018 मधील ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून ठरला आहे. चित्रपटात रणवीर सिंह आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत. रोहित शेट्टी यांनी सिंबा चित्रपटाशिवाय दिलवाले, सिंघम, चेन्नई एक्स्प्रेस, गोलमाल सीरीज, बोल बच्चन आणि ऑल द बेस्ट सारखे चित्रपट बॉलिवूडमध्ये दिले आहेत. आतापर्यंत रोहित शेट्टी यांचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरले आहेत.

संबंधित बातम्या : 

प्रजासत्ताक दिनादिवशी अक्षय कुमारने लॉन्च केला FAU-G, म्हणतो आजपासून मिशन सुरु…!

Republic Day 2021 | प्रजासत्ताक दिनाला बघा देशप्रेमाच्या या खास वेब सीरीज!

सोनू सूदची शपथ ते जॉन अब्राहमचं चाहत्यांना गिफ्ट, बॉलिवडूने असा साजरा केला प्रजासत्ताक दिन…!

(Possibility to change the date of Akshay Kumar’s Sooryavanshi movie)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.