‘राधेश्याम’ फ्लॉप ठरल्यामुळे प्रभासच्या चाहत्याने संपवलं आयुष्य

'बाहुबली' फेम प्रभासचा (Prabhas) जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याचा 'राधेश्याम' (Radhe Shyam) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. याचमुळे प्रभासच्या एका चाहत्याने आत्महत्या केली.

'राधेश्याम' फ्लॉप ठरल्यामुळे प्रभासच्या चाहत्याने संपवलं आयुष्य
PrabhasImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 3:50 PM

‘बाहुबली’ फेम प्रभासचा (Prabhas) जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याचा ‘राधेश्याम’ (Radhe Shyam) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. याचमुळे प्रभासच्या एका चाहत्याने आत्महत्या केली. आंध्रप्रदेशमधल्या कुर्नुल जिल्ह्यातील एका 24 वर्षीय चाहत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रवी तेजा असं या चाहत्याचं नाव आहे. रवी हा प्रभासचा खूप मोठा चाहता होता. प्रभासच्या ‘राधेश्याम’ या चित्रपटाला मिळत असलेल्या नकारात्मक प्रतिसादाला तो सहन करू शकला नाही, असं म्हटलं जातंय. गळफास घेण्यापूर्वी रवी त्याच्या आईसोबत या चित्रपटाविषयी बोलत होता. ‘राधेश्याम’ला मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादाबद्दल तो त्याच्या आईशी बोलला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

‘राधेश्याम’ हा प्रभासचा आणखी एक बिग बजेट चित्रपट आहे. जवळपास 300 कोटी रुपयांहून अधिक खर्च या चित्रपटावर करण्यात आला आहे. मात्र कथेच्या बाबतीत तो अपयशी ठरला, असं चित्रपट समीक्षकांचं म्हणणं आहे. असं असलं तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई चांगली होत आहे. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडेची मुख्य भूमिका आहे. तर भाग्यश्री, सत्यराज, कृष्णम राजू, जगपती बाबू, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, मुरली शर्मा, कुणार रॉय कपूर, जयराम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

View this post on Instagram

A post shared by Prabhas (@actorprabhas)

‘बाहुबली’ या चित्रपटानंतर प्रभासचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. ‘राधेश्याम’ या त्याच्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार चर्चा होती. ‘साहो’नंतर बऱ्याच कालावधीनंतर त्याचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र या चित्रपटाने काहींची निराशा केली. ‘राधेश्याम’वर पैसा अमाप खर्च करण्यात आला, मात्र कथेच्या बाबतीत त्यात पाहण्यासारखं काही नाही, असं मत प्रेक्षकांनी नोंदवलं.

हेही वाचा:

“बॉलिवूडचे सर्व पाप धुवून टाकले”; ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिल्यानंतर कंगनाचा टोला

‘द काश्मीर फाईल्स हा चांगला चित्रपट, प्रत्येकानं पहावा’; मोदींकडून कौतुकाचा वर्षाव

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.