Prabhas: ‘राधेश्याम’ फ्लॉप का झाला? प्रभासने सांगितलं कारण

'बाहुबली' या चित्रपटानंतर अभिनेता प्रभास (Prabhas) हा त्याच्या 'लार्जर दॅन लाइफ' भूमिकांसाठी ओळखला जाऊ लागला. मात्र जेव्हा जेव्हा त्याने या इमेदला छेद देऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या पदरी अपयशच आलं.

Prabhas: 'राधेश्याम' फ्लॉप का झाला? प्रभासने सांगितलं कारण
PrabhasImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 9:26 AM

‘बाहुबली’ या चित्रपटानंतर अभिनेता प्रभास (Prabhas) हा त्याच्या ‘लार्जर दॅन लाइफ’ भूमिकांसाठी ओळखला जाऊ लागला. मात्र जेव्हा जेव्हा त्याने या इमेदला छेद देऊन वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या पदरी अपयशच आलं. श्रद्धा कपूरसोबतचा ‘साहो’ हा चित्रपट त्याचंच उदाहरण आहे. इतकंच नव्हे तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राधेश्याम’ (Radhe Shyam) या बिग बजेट चित्रपटात त्याने पुन्हा असाच प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पूजा हेगडेसोबतचा (Pooja Hegde) हा चित्रपटसुद्धा फ्लॉप ठरला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रभास यामागचं कारण काय असू शकतं, याविषयी व्यक्त झाला. त्याचप्रमाणे दाक्षिणात्य चित्रपट जगभरात आपली छाप सोडण्यात कशाप्रकारे यशस्वी ठरत आहेत, यावरही त्याने प्रतिक्रिया दिली.

“एस. एस. राजामौली यांनी माझी लार्जर दॅन लाइफ बाहुबलीची इमेज तयार केली. मात्र काही लोकांना मला तशाच पद्धतीच्या भूमिकेत पहायचंय. प्रेक्षकांनी बाहुबलीला जसा प्रतिसाद दिला, तसाच प्रतिसाद माझ्या इतर चित्रपटांनाही मिळावा यासाठी माझ्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांवर खूप दबाव असतो. माझ्यावर मात्र तसा काही दबाव नाही. बाहुबलीसारखा चित्रपट मला मिळावा हे माझं नशिब आहे पण मला इतरही भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं आहे. राधेश्यामला अपेक्षित असा प्रतिसाद न मिळण्यामागचं कारण कदाचित कोविड असू शकतं किंवा कदाचित आम्ही स्क्रिप्टमध्ये काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं असणार. याबद्दल प्रेक्षकच स्पष्टपणे सांगू शकतील. कदाचित मला तशा भूमिकांमध्ये त्यांना पहायचं नसेल किंवा जरी पहायचं असलं तरी त्यांच्या अपेक्षा माझ्याकडून खूप असतील”, असं प्रभास म्हणाला.

यावेळी प्रभासने हिंदी भाषेवर अधिकाधिक भर देण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. “मला आणखी प्रयत्न करावे लागतील. साहो ते राधेश्यामपर्यंत माझ्यात बरीच सुधारणा झाली आहे. पण मला हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवण्याची गरज आहे”, असं तो पुढे म्हणाला. ‘राधेश्याम’मध्ये प्रभासने ज्योतिषाची भूमिका साकारली होती. मात्र खऱ्या आयुष्यात त्याचा या गोष्टींवर विश्वास नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. “ज्योतिषासंबंधित मी अनेक रंजक कथा ऐकल्या आहेत. मात्र मी माझा हात कधीच कोणाला दाखवला नाही”, असं त्याने सांगितलं. प्रभासचे तीन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. ‘आदिपुरुष’, ‘सलार’ आणि ‘प्रोजेक्ट के’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

हेही वाचा:

बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत शाहरुख-सलमानचा खास अंदाज; पहा PHOTO

Ranbir Alia Wedding Gifts: करीनाकडून डायमंड नेकलेस तर नीतू कपूर यांच्याकडून 6BHK फ्लॅट; रणबीर-आलियाला मिळाले ‘हे’ महागडे गिफ्ट्स

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.