मुंबई : साऊथ चित्रपटाचे स्टार प्रकाश राज कायमच चर्चेत असतात. अनेकदा प्रकाश राज (Prakash Raj) यांना त्यांच्या बिनधास्त बोलण्यामुळे लोकांची टिकाही मोठ्या प्रमाणात सहन करावी लागते. प्रकाश राज यांचे नाव येताच प्रेक्षकांना सिंघम चित्रपटातील जयकांत शिखरेची यांची आठवण येते. प्रकाश राज यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. धडाकेबाज अभिनयासाठी प्रकाश राज ओळखले जातात. मात्र, अनेकदा प्रकाश राज हे वादाच्या भोवऱ्यामध्ये असतात. यावेळी प्रकाश राज यांनी आपला मोर्चा थेट ऐकताच या चित्रपटाकडे वळवला. मग काय चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनीही प्रकाश राज यांचा चांगलाच क्लास लावला. एक भली मोठी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी प्रकाश राज यांना खडेबोल सुनावले. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी टीका (Criticism) केली होती. अनुराग कश्यप आणि विवेक अग्निहोत्री यांच्यामधील वाद तर सर्वांनाच माहिती आहे.
प्रकाश राज यांनी केरळमधील मातृभूमी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ लेटर्समध्ये थेट द कश्मीर फाईल्स चित्रपटाला बकवास म्हटले आहे. प्रकाश राज यांनी द कश्मीर फाईल्स चित्रपटाला बकवास म्हटल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली.
द कश्मीर फाईल्स चित्रपटाचा विषय म्हटल्यावर विवेक अग्निहोत्री हे बोलण्यापासून कसे मागे राहू शकतात? आता शेवटी विवेक अग्निहोत्री यांनी प्रकाश राज यांच्या त्या विधानाचा चांगलाच समाचार घेत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये.
A small, people’s film #TheKashmirFiles has given sleepless nights to #UrbanNaxals so much that one of their Pidi is troubled even after one year, calling its viewer’s barking dogs. And Mr. Andhkaar Raj, how can I get Bhaskar, she/he is all yours. Forever. pic.twitter.com/BbUMadCN8F
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) February 9, 2023
विवेक अग्निहोत्री पोस्टमध्ये म्हणाले की, द कश्मीर फाईल्स या छोट्याशा चित्रपटाने अर्बन नक्षलवाद्यांची झोप उडवली आहे. आलम असा आहे की, वर्षभरानंतरही त्यांची पिढी अस्वस्थ आहे.
ते प्रेक्षकांना भुंकणारा कुत्रा म्हणत आहेत आणि मी भास्करला मिस्टर अंधाकार राजमध्ये कसे मिळवू शकतो, हे सर्व तुझेच आहे…असे विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी नाव न घेता प्रकाश राज यांच्यावर टिका करत समाचार घेतला आहे.
आता विवेक अग्निहोत्री यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी या ट्विटवर कमेंट करत प्रकाश राज यांना खडेबोल सुनावले आहेत. इतकेच नाही तर अनेकांनी प्रकाश राज यांच्या बोलण्यासाठी लक्ष देऊ नये, असा सल्ला विवेक अग्निहोत्री यांना दिला.