Kaun Hai Pravin Tambe VIDEO: बायोपिक पाहून टेनिस क्रिकेटचा बाहशाह प्रवीण तांबेंच्या डोळ्यात आलं पाणी
क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांचा जीवनपट उलगडणारा 'कौन प्रवीण तांबे' (Kaun Pravin Tambe) हा बायोपिक नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) प्रवीण तांबेंची भूमिका साकारली आहे.
क्रिकेटपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) यांचा जीवनपट उलगडणारा ‘कौन प्रवीण तांबे’ (Kaun Pravin Tambe) हा बायोपिक नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. यामध्ये अभिनेता श्रेयस तळपदेनं (Shreyas Talpade) प्रवीण तांबेंची भूमिका साकारली आहे. प्रवीण यांनी कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघासोबत हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्याबद्दल भावना व्यक्त करताना प्रवीण यांना अश्रू अनावर झाले. केकेआरच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये प्रवीण तांबे हे केकेआर टीम आणि इतर स्टाफ मेंबर्ससोबत हा चित्रपट पाहताना दिसत आहेत. चित्रपट संपल्यानंतर ते काही शब्द बोलण्यासाठी उभे राहिले, पण भावना व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आला.
केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर या व्हिडिओमध्ये म्हणाला, “आम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक होतो आणि आज अखेर आम्हाला तो पाहायला मिळाला. चित्रपट पाहून आम्हीसुद्धा भावूक झालो, त्यातली गाणीही छान होती. शेवटी प्रवीण तांबे यांचं भाषण ऐकून मीसुद्धा भावूक झालो होतो.” वय हा केवळ आकडा आहे, ही म्हण प्रवीण तांबे यांना तंतोतंत लागू होते. वयाच्या 41 व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून ‘इंडियन प्रीमिअर लीग’मध्ये (IPL) पदार्पण करणाऱ्या तांबेंनी हे दाखवून दिलं की, वयानुसार स्वप्नांची व्याख्या करता येत नाही.
पहा व्हिडीओ-
“????? ???? ?? ?? ???? ??????, ???? ?? ???? ????” ?
? Scenes from last night as the boys watched the inspiring #KaunPravinTambe at a special screening by @DisneyPlusHS! @legytambe #KKRHaiTaiyaar #IPL2022 pic.twitter.com/LKjABXk1Qj
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 1, 2022
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-
@legytambe “Never Give Up On Your Dreams” – Thank You for showing me what it really means Guru!!! ????
— Sunil Prabhale (@sunilprabhale) April 4, 2022
Ture fighter, real dreamer, real hero… Hats off @legytambe
— Ankur Verma (@anakarsmusic) April 3, 2022
“बर्याच लोकांना माहित आहे की मी 41 वर्षांचा असताना पदार्पण केलं होतं, परंतु त्याआधी मी काय केलं हे त्यांना माहीतच नव्हतं. या चित्रपटाच्या माध्यमातून ते माझा संघर्ष पाहतील आणि मला जाणून घेतील अशी आशा आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण कधीही हार मानू नये, हे यातून त्यांना समजेल”, अशा शब्दांत प्रवीण तांबे व्यक्त झाले. 1 एप्रिल रोजी हा चित्रपट ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये श्रेयससोबतच आशिष विद्यार्थी, परम्ब्रता चॅटर्जी आणि अंजली पाटील यांच्या मुख्य भूमिका आहेत. जयप्रद देसाई यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
हेही वाचा:
VIDEO: अंकिता लोखंडेने दिली ‘गुड न्यूज’? कंगनाच्या शोमध्ये उघड केलं गुपित
Lock Upp: सोशल मीडिया अॅपद्वारे लोकांकडून 50 लाख रुपये लुटले; प्रसिद्ध मॉडेलचा खुलासा