Kajal Aggarwal: ‘आपलं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे, पण..’; पतीसाठी काजल अग्रवालची भावनिक पोस्ट

अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आणि गौतम किचलू (Gautam Kitchlu) हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. काजलने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौतमसाठी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने गौतमचे आभार मानले आहेत.

Kajal Aggarwal: 'आपलं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे, पण..'; पतीसाठी काजल अग्रवालची भावनिक पोस्ट
kajal aggarwal, Gautam Kitchlu Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 10:57 AM

अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) आणि गौतम किचलू (Gautam Kitchlu) हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. काजलने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौतमसाठी भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने गौतमचे आभार मानले आहेत. प्रेग्नंसीच्या (Pregnancy) काळात त्याने तिची कशाप्रकारे काळजी घेतली, याविषयी काजलने यात लिहिलं आहे. गौतम आणि काजलने 30 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईत लग्न केलं. लग्नापूर्वी या दोघांनी तीन वर्षे एकमेकांना डेट केलं. आई आणि बाबाचा नवीन प्रवास सुरू करण्यापूर्वी काजलने पतीसाठी ही भावनिक पोस्ट लिहिली आहे. गौतम हा सर्वोत्तम पिता बनू शकेल, याची जाणीव तिने या पोस्टद्वारे त्याला करून दिली आहे.

‘आपलं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे’

‘प्रिय पती, एखाद्या मुलीच्या अपेक्षांवर खरा उतरू शकेल असा पती आणि भावी पिता बनल्याबद्दल तुझे आभार. नि:स्वार्थपणे माझी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. मी आजारी असताना माझ्यासोबत प्रत्येक रात्र जागून काढल्याबद्दल, मला काऊचवर कम्फर्टेबल वाटत असल्याने अनेक आठवड्यांपासून तू सुद्धा तिथेच निजल्याबद्दल, डॉक्टरांना लगेच मेसेज केल्याबद्दल आणि ब्रॅक्सटन हिक्सच्या कॉन्ट्रॅक्शनमुळे मला आईकडे घेऊन जाण्याबद्दल, या सर्व गोष्टींदरम्यान कधीही संकोच न वाटून घेतल्याबद्दल आणि मला कधीही वाईट वाटू न दिल्याबद्दल, मी वेळेत जेवली का, पुरेसं पाणी प्यायले का, मी कम्फर्टेबल आहे का याबाबत माझी काळजी घेतल्याबद्दल आणि शेवटचं म्हणजे माझ्यावर प्रेम केल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आपलं गोंडस बाळ या जगात येण्याआधी तू किती चांगला व्यक्ती आहेस आणि चांगला पिताही होशील याची जाणीव मला तुला करून द्यायची आहे.’

‘गेल्या 8 महिन्यात मी तुला सर्वांत प्रेमळ बाबा होताना पाहिलंय. मला माहित आहे की या बाळावर तुझं किती प्रेम आहे आणि तू आधीच किती काळजी घेत आहेस. मी खूप भाग्यवान आहे की आपल्या बाळाला असा पिता मिळाला आहे जो विनाशर्त प्रेम करतो आणि ज्याच्याकडे मी एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहते. आपलं आयुष्य मोठ्या प्रमाणात बदलणार आहे आणि त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. आपल्याला आता निवांत एकत्र वेळ मिळणार नाही, दर वीकेंडला आपण चित्रपट पहायला जाऊ शकणार नाही किंवा निवांत शोज पाहू शकणार नाही, कदाचित आपण काही काळासाठी पार्ट्यांसाठी बाहेर जाऊ शकणार नाही किंवा डेट नाइट्स सेलिब्रेट करू शकणार नाही. पण आपल्याकडे एक अत्यंत गोंडस बाळ असेल जो आपल्या मनाला आनंदाने परिपूर्ण करेल.’

काजलची इन्स्टा पोस्ट-

‘अनेकदा आपल्याला रात्र जागून काढावी लागेल, काहीवेळा आपल्याला बरं वाटू शकणार नाही पण ही आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वेळ असेल. इतर अनेक गोष्टी बदलतील पण एक गोष्ट मात्र तशीच राहील आणि ती म्हणजे माझं तुझ्यावर असलेलं प्रेम. तू माझ्या पाठीशी नेहमी आहेस आणि असशील याचा मला आनंद आहे. तू अत्यंत प्रेमळ पिता बनशील आणि आपण जगत असलेल्या आयुष्यावर माझं खूप प्रेम आहे,’ अशा शब्दांत काजलने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा:

Dharmaveer: “जंगलात राहून वाघाशी, महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं”; आनंद दीघेंवरील चित्रपटाचा दमदार टीझर

VIDEO: कतरिना कैफ प्रेग्नंट आहे का? एअरपोर्टवरील व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.