Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू; पहा Video

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट.. ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी लवकरच लग्नबंधनात (Ranbir Alia Wedding) अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू; पहा Video
Ranbir Kapoor and Alia BhattImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 9:37 AM

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट.. ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी लवकरच लग्नबंधनात (Ranbir Alia Wedding) अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर किंवा आलियाने (Ranbir Alia) या लग्नाविषयी अद्याप कोणतीही माहिती दिली नसली तरी 13 ते 17 एप्रिलदरम्यान हे दोघं लग्नगाठ बांधणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईतील चेंबूर इथल्या आर. के. बंगल्यावर (RK House) मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित रणबीर-आलिया लग्न करतील. याच लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या तयारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर आणि पापाराझी विरल भयानीच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये आलियाचे पीआर, सिक्युरिटी हेड आणि मॅनेजर हे रणबीरच्या घराची रेकी करताना दिसत आहेत.

आलियाची पब्लिसिस्ट निलूफर कुरेशी, सिक्युरिटी हेड युसूफभाई आणि तिची मॅनेजर ग्रिष्मा हे तिघे या व्हिडीओत रेकी करताना पहायला मिळत आहेत. पारंपरिक पंजाबी विवाहपद्धतीनुसार हे लग्न पार पडणार असून आर.के. हाऊसमधील लग्नानंतर रणबीर-आलिया हे मुंबईतील गुरुद्वारामध्ये लंगरचं आयोजन करणार असल्याचीही माहिती आहे. रणबीर कपूरचे आईवडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांनीसुद्धा त्यांच्या लग्नानंतर गुरुद्वारामध्ये लंगरचं आयोजन केलं होतं. हीच परंपरा रणबीर-आलिया पुढे कायम ठेवणार आहेत. कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नाप्रमाणेच या लग्नसोहळ्यातही पाहुण्यांना मोबाइल वापरण्यास बंदी आहे.

लग्नाच्या तयारीचा व्हिडीओ-

नीतू कपूर यांनी नुकतीच सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या स्टोअरला भेट दिली. या लग्नसोहळ्याला अयान मुखर्जी, करण जोहर, आदित्य रॉय कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण उपस्थित असणार असल्याचंही कळतंय. रणबीर-आलियाने नुकतंच त्यांच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. त्यानंतरच्या प्रोजेक्ट्ससाठी होणाऱ्या शूटिंगच्या तारखाही त्यांनी लग्नसोहळ्याच्या हिशोबाने ठरवल्या असल्याचं समजतंय.

हेही वाचा:

Maha Minister: 11 लाखांच्या पैठणीवरून वाद; आदेश बांदेकरांना नेटकरी म्हणाले, “ही साडी नेसून..”

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नावरील हे भन्नाट मीम्स एकदा पहाच; पोट धरून हसाल!

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.