Pathaan | खरोखरच पठाण चित्रपटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी फिदा?, थेट भाषणामध्ये म्हणाले…
शाहरुख खान याचा पठाण चित्रपट रिलीज झाला आणि पाहिल्याच दिवशी चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर जलवा दाखवला. शाहरुख खान याचे अनेकांनी पठाण चित्रपटासाठी काैतुक केले.
मुंबई : शाहरुख खान याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पठाण (Pathaan) हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. विशेष म्हणजे पठाण हा चित्रपट शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरलाय. या चित्रपटाचा जलवा हा फक्त भारतामध्येच नाही तर विदेशातही बघायला मिळालाय. गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करू शकत नव्हते. बाॅलिवूडच्या मोठ्या स्टारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सतत फ्लाॅप जात होते. तर दुसरीकडे साऊथच्या चित्रपटांनी बाॅक्स आॅफिसवर जबरदस्त अशी कामगिरी केली. सतत चित्रपट (Movie) फ्लाॅप जात असल्याने बाॅलिवूडला मोठे नुकसान सहन करावे लागले. इतकेच नाही तर यादरम्यान अनेकांनी बाॅलिवूडवर टीका देखील केली. मात्र, शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅलिवूडसाठी एखाद्या संजीवनीसारखा नक्कीच ठरलाय. पठाण चित्रपटाने बाॅलिवूडला एक नवीन उमेद नक्कीच दिलीये.
शाहरुख खान याचा पठाण चित्रपट रिलीज झाला आणि पाहिल्याच दिवशी चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर जलवा दाखवला. शाहरुख खान याचे अनेकांनी पठाण चित्रपटासाठी काैतुक केले. या चित्रपटामध्ये शाहरुख खान याने जबरदस्त अभिनय केला आहे.
आता पठाण चित्रपटाचे काैतुक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचा दावा शाहरुख खान याचे चाहते करत आहेत. श्रीनगरमधील थिएटर दशकांनंतर हाऊसफुल्ल झाल्याचे दिसत आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. हाच व्हिडीओ व्हायरल होतोय.
After decades, the Theatres of Srinagar are going Housefull: PM #NarendraModi#ShahRukhKhan with #Pathaan has done unimaginable things. pic.twitter.com/7IlYCsMuJ4
— JUST A FAN. (@iamsrkfan_brk) February 8, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदेमधील या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हे भाषण पाहून शाहरुख खान याचे चाहते आनंदी झाल्याचे दिसत आहे. या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट देखील करताना दिसत आहेत. शाहरुख खान याचा पठाण चित्रपटाला श्रीनगरमधूनही मोठे प्रेम मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारले होते की, आता पुढीलही चित्रपटांमध्ये तुम्ही हिरोच्या भूमिकेत असणार की हिरो किंवा हिरोइंनच्या वडिलांच्या भूमिकेत ? यावर शाहरुख खान याने जबरदस्त उत्तर देत म्हटले होते की, मी तर हिरोचीच भूमिका करेल, तू करण बापाची भूमिका…
पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. चित्रपटातील बेशर्म रंग या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद निर्माण झाला होता. मात्र, या वादाचा प्रत्यक्षात चित्रपटालाच मोठा फायदा झाल्याचे दिसत आहे.