मुंबई : जगभरात आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचा आज वाढदिवस आहे. आज त्या 92 वर्षांच्या झाल्या आहेत. लता दीदी, त्यांचे चाहते आणि बॉलिवूडसाठी आजचा दिवस खूप खास आहे. सर्व चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्यासाठी खास ट्विट करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकरांसाठी ट्विट केले आणि लिहिले की, ‘आदरणीय लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचा मधुर आवाज संपूर्ण जगात गाजतो. त्यांच्या नम्रतेबद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दलच्या उत्कटतेबद्दल सर्वत्र त्यांचा आदर केला जातो. वैयक्तिकरित्या, त्यांचे आशीर्वाद महान शक्तीचा स्रोत आहेत. मी लता दीदींना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.’
Birthday greetings to respected Lata Didi. Her melodious voice reverberates across the world. She is respected for her humility & passion towards Indian culture. Personally, her blessings are a source of great strength. I pray for Lata Didi’s long & healthy life. @mangeshkarlata
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2021
हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला होता. लता मंगेशकर यांनी आपल्या आयुष्यात संगीत क्षेत्रात अनेक विक्रम केले आहेत. त्यांना गायन क्षेत्रात अनेक सन्मानही मिळाले आहेत. गायन क्षेत्रात अमूल्य योगदानासाठी त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) हे एक असं नाव आहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. संगीताच्या जगात हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. ‘भारतरत्न’ लता मंगेशकरांच्या आवाजात जादू आहे. त्यांच्याकडे दैवी प्रतिभा आहे, वगैरे असं आपण बऱ्याचदा ऐकतो, पण या सगळ्यात त्यांचा संघर्ष फार कमी अधोरेखित केला जातो.
लता मंगेशकर यांनी अशा वेळी गायला सुरुवात केली, जेव्हा तंत्रज्ञान इतके प्रगत नव्हते. म्युझिक रेकॉर्डिंग आणि मिक्सिंगसाठी इतकी प्रगत उपकरणे नव्हती. ‘महल’ मधील ‘आयेगा आने वाला’ या गाण्याने लता मंगेशकर यांना खूप प्रसिद्धी मिळवून दिली. फार कमी लोकांना माहिती आहे की या गाण्यातील आवाजाचा चढउतार कोणत्याही तंत्राच्या मदतीने तयार केला गेला नाही, तर तो एका विशेष प्रकारे रेकॉर्ड केला गेला. जर, तुम्हाला ते गाणे आठवत असेल, जेव्हा अशोक कुमार आरशासमोर उभे राहतात आणि गाणे सुरू होते, तेव्हा दुरून आवाज येऊ लागतो आणि नंतर तीन-चार ओळी नंतर ते जवळून आल्यासारखे वाटते. या प्रकारचा ध्वनी प्रभाव तंत्राच्या मदतीने तयार केला जाऊ शकतो, परंतु त्या वेळी गायकाला हे करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती..