दिलखेच अदांमुळे एका रात्रीत प्रसिद्ध झालेली ही मुलगी आठवतेय का, समुद्र किनारी काय करतेय व्हिडीओत पाहाच
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात अंदाजा नाहीये. बऱ्याचदा असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्याला युजर्सचे प्रचंड प्रेम मिळताना दिसते. लग्नातील खास व्हिडीओ प्राण्यांचे काही व्हिडीओ हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. काही काळापूर्वी एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियार तूफान व्हायरल झाला होता.
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल आणि एका रात्रीत कोणाचे आयुष्य बदलेले याचा अजिबातच नेम नाहीये. काही महिन्यांपूर्वी एका मुलीचा एक फोटो (Photo) आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे ज्या मुलीचा व्हिडीओ तूफान व्हायरल होत होता, ती कोणतीही स्टार नसून एक शालेय शिक्षण घेणारी मुलगी होती. मात्र, तिचा व्हिडीओ इतका तूफान व्हायरल झाला की, ती मुलगी एका रात्रीमध्ये मोठी स्टार झाली. सोशल मीडियावर (Social media) आता तिला लाखोंच्या घरात लोक फाॅलो देखील करतात. ही स्टार आता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून कायमच फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करताना दिसते.
आपल्या दिलखेच अदांमुळे एका रात्रीत प्रिया प्रकाश हिने लोकप्रियता मिळवलीये. तरुणांमध्ये कित्येक दिवस तरी तिच्या त्या भुवई उंचावणाऱ्या आणि डोळा मारणाऱ्या व्हिडीओची चर्चा होती. एका रात्रीत सोशल मीडियावर फेमस प्रिया प्रकाश झाली. नुकताच प्रिया प्रकाश हिने इंस्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
प्रिया प्रकाश हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिचा बिकिनी लूक जबरदस्त दिसत आहे. समुद्र किनारी धमाल करताना प्रिया प्रकाश ही दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनेक पोज देताना प्रिया प्रकाश ही दिसत आहे. प्रिया प्रकाश हिचा हा व्हिडीओ मालदीवमधील आहे. प्रिया प्रकाश ही मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
मालदीवमध्ये प्रिया प्रकाश हिचा अत्यंत बोल्डलूक दिसत आहे. नुकताच प्रिया प्रकाश हिने मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग देखील प्रिया प्रकाश हिची दिसते. इतकेच नाही तर प्रिया प्रकाश हिला थेट श्रीदेवी बंग्लो या चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी देखील मिळाली. प्रिया प्रकाश हिच्या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
प्रिया प्रकाश हिचा तो डोळा मारणाऱ्या व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. तरुणांमध्ये तर खास प्रिया प्रकाश हिची क्रेझ बघायला मिळत होती. सोशल मीडियावर प्रिया प्रकाश ही अत्यंत बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच प्रिया प्रकाश हिने निळ्या रंगाच्या बिकिनीमधील खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले होते.