प्रियांका चोप्राने मोरबी ब्रिज दुर्घटनेवर व्यक्त केला शोक, पोस्ट शेअर करत म्हटले की…
मुंबईमधील काही फोटोही प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर करत मुंबई मेरी जान म्हटले आहे.
मुंबई : प्रियांका चोप्रा तब्बल तीन वर्षांनंतर भारतामध्ये आलीये. स्वत: प्रियांकाने याची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. प्रियांकाचा विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. इतकेच नाही तर मुंबईमधील काही फोटोही प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर करत मुंबई मेरी जान म्हटले आहे. प्रियंकासोबत मुलगी मालती देखील भारतामध्ये आली असल्याची चर्चा आहे. मात्र, विमानतळावरील व्हिडीओमध्ये मालती दिसत नाहीये.
गुजरातमधील मोरबी येथे रविवारी संध्याकाळी नदीवरील पूल कोसळून झालेल्या भीषण अपघातात 135 जणांचा मृत्यू झाला. याची माहिती प्रियांका चोप्राला कळताच तिने यावर दु:ख व्यक्त केले. प्रियांकाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर मोरबी येथील फोटो शेअर करत दु:ख व्यक्त करत जखमी लोक लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली.
Deeply saddened by the tragedy of suspension bridge collapse in Morbi. My Deepest condolences to all the families who have lost their loved ones in this tragedy and pray for the speedy recovery who are injured.?#morbi #gujarat
— Anupam Kher (@AnupamPKher) October 30, 2022
प्रियांकाची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला. मोरबी येथे घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जातोय. प्रियांका चोप्रा तीन वर्षांनंतर भारतामध्ये आलीये. प्रियांका सोशल मीडियावर कायचम सक्रिय असते.