Priyanka Chopra | ‘निक जोनासची पत्नी’ म्हटल्यावर प्रियांकाचा पारा चढला, पाहा नेमकं काय झालं…
पती निक जोनासचे (Nick Jonas) आडनाव सोशल मीडियावरून काढून टाकणारी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आता 'निक जोनासची पत्नी' संबोधण्यात आल्याने प्रचंड संताप व्यक्त करत आहे. तिने इंस्टाग्रामवर काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यात तिला 'निक जोनासची पत्नी' असे संबोधण्यात आले आहे.
मुंबई : पती निक जोनासचे (Nick Jonas) आडनाव सोशल मीडियावरून काढून टाकणारी प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आता ‘निक जोनासची पत्नी’ संबोधण्यात आल्याने प्रचंड संताप व्यक्त करत आहे. तिने इंस्टाग्रामवर काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यात तिला ‘निक जोनासची पत्नी’ असे संबोधण्यात आले आहे. अभिनेत्रीने काही बातम्यांचे स्क्रीनशॉट शेअर केले आणि तिने तिच्या बायोमध्ये तिची IDMB लिंक जोडावी का असे विचारले. तर महिलांना अशी वागणूक कशी दिली जाऊ शकते?, असा सवालही प्रियांकाने केला.
प्रियंका चोप्राने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये “गुड मॉर्निंग अमेरिका शो दरम्यान मॅट्रिक्स चित्रपटाची सहकलाकार केनू रीव्हज बद्दल निक जोनासची पत्नी बोलत आहे”, असे लिहिलेले दिसते. ही बातमी वाचून प्रियांकाने लिहिले की, ‘हे खूप मनोरंजक आहे की, मी सर्वात प्रतिष्ठित चित्रपटांपैकी एकाची जाहिरात करत आहे आणि मला अजूनही ‘निक जोनासची पत्नी’ म्हणून संबोधले जाते.’
‘सर्वाधिक प्रशंसनीय महिला – 2021’च्या यादीत प्रियांकाचा समावेश!
भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राने देखील ‘मोस्ट अॅडमायर्ड वुमन-2021’च्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. या वर्षी टॉप 10च्या यादीत स्थान मिळवणारी प्रियांका ही एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ही अभिनेत्री या यादीत 15 व्या क्रमांकावर होती. मात्र, क्रमवारीत पुढचा टप्पा गाठत तिने यंदा दहावे स्थान पटकावले आहे. वृत्तानुसार, या सर्वेक्षणात 38 देशांतील एकूण 42,000 लोकांचा समावेश करण्यात आला होता.
प्रियांकाने हटवले पती निक जोनासचे आडनाव!
लग्न केल्यानंतर प्रियांकाने सोशल मीडियावर तिचे आडनाव प्रियांका चोप्रा हे बदलून प्रियांका चोप्रा जोनास केले होते. पण, अलीकडेच प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम बायोमधून पती निक जोनासचे आडनाव काढून टाकले आहे, त्यानंतर प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या बातम्याही चर्चेत आल्या होत्या.
प्रियांका चोप्रा शेवट ‘द व्हाइट टायगर’ आणि ‘द स्काय इज पिंक’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती. ती अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा भाग असणार आहे आणि आगामी काळात ती ‘मॅट्रिक्स’ सारख्या चित्रपटात दिसणार आहे.