Priyanka Chorpa-Nick Jonas | केवळ नाव हटलं पण सारं काही आलबेल! निक जोनासच्या व्हिडीओवर प्रियांकाची ‘खास’ कमेंट!

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) यांच्या घटस्फोटाच्या चर्चेने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. वास्तविक प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या नावामधून जोनास हे आडनाव काढून टाकले आहे.

Priyanka Chorpa-Nick Jonas | केवळ नाव हटलं पण सारं काही आलबेल! निक जोनासच्या व्हिडीओवर प्रियांकाची ‘खास’ कमेंट!
Priyanka-Nick
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 11:53 AM

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) यांच्या घटस्फोटाच्या चर्चेने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. वास्तविक प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या नावामधून जोनास हे आडनाव काढून टाकले आहे. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, आता निक जोनासच्या एका व्हिडीओने या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.

घटस्फोटाची चर्चा झाल्यानंतर निक जोनासने एक फिटनेस व्हिडीओ शेअर केला आहे. तो जिममध्ये डंबेल उचलून व्यायाम करताना दिसत आहे. घटस्फोटाच्या चर्चांची पर्वा न करता आपल्या बायसेप्सवर लक्ष केंद्रित करत निक या व्हिडीओमध्ये त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. मुद्दा असा आहे की, निकच्या या व्हिडीओवर पत्नी प्रियांकाची गोड कमेंटही आली आहे. प्रियांकाने लिहिले- ‘Damn! I just died in yours arms…’

View this post on Instagram

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

प्रियांकाच्या आईने दिली प्रतिक्रिया

प्रियांकाची निकसाठीची ही प्रेमळ कमेंट घटस्फोटाच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे सिद्ध करते. दोघांमधील प्रेमाचा प्रवास अजूनही पहिल्या भेटीसारखाच सुरू आहे. दुसरीकडे, प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनीही या बातम्यांना अफवा असल्याचे म्हटले आहे. अशा खोट्या बातम्या पसरवू नका, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

नुकतीच जोडीने साजरी केली दिवाळी

प्रियंका आणि निक यांनी नुकतीच त्यांच्या पहिल्या घरात पहिली दिवाळी साजरी केली. लग्नानंतर प्रियंका आणि निक जोनासने पहिल्यांदा एकमेकांसोबत दिवाळी साजरी केली. ज्यामध्ये दोघेही पारंपरिक कपड्यांमध्ये माँ लक्ष्मीची पूजा करताना दिसले. हे फोटो प्रियांकाने स्वतः सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यानंतर चाहत्यांनी प्रियांकाने परंपरा पूर्ण केल्याबद्दल तिचे खूप कौतुक केले होते.

पतीच्या वाढदिवशी प्रियांकाने तिचे शूट काही काळासाठी सोडले, पण निकसाठी सरप्राईज प्लॅन करायला विसरली नाही. दोघांमधील प्रेम आणि त्यांची एकमेकांप्रतीची समजूत पाहून घटस्फोटाच्या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण झाले होते आणि आता प्रियांकाच्या आईनेच हे चुकीचे असल्याचे वक्तव्य केले आहे.

याच दरम्यान, प्रियांकाच्या मॅट्रिक्स या चित्रपटाचे पोस्टरही रिलीज झाले आहे. प्रियांकाचा लूक खूपच वेगळा आहे आणि चाहत्यांनाही त्यावर चांगला प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे प्रियांकाचे हे पोस्टर तिचा दिर डॅनियल जोन्सनेही शेअर केले आहे. त्यामुळे देसी गर्लच्या आयुष्यात सर्वकाही सुरळीत आहे असे म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा :

Aamir Khan | आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार? जाणून घ्या नेमकं सत्य काय…

Kangana Ranaut Controversy | कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, ‘भीकेचं स्वातंत्र्य’ वक्तव्याप्रकरणी कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल!

Happy Birthday Amruta Khanvilkar | ‘वाजले की बारा..’ म्हणत गाजवलं मराठी विश्वं तर, हिंदीतही अमृता खानविलकरला पाहण्यास प्रेक्षक ‘राझी’!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.