Aishwarya Rai Bachchan: राणी नंदिनीच्या लूकमधील ऐश्वर्याची चाहत्यांना भुरळ; मणिरत्नम यांच्या बिग बजेट चित्रपटाची उत्सुकता

एकीकडे हा पोस्टर पाहून चाहते थक्क झालेत तर पती अभिषेक बच्चनकडूनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. अभिषेकने ऐश्वर्याची ही पोस्ट त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत हृदयाचे इमोटिकॉन पोस्ट केले आहेत.

Aishwarya Rai Bachchan: राणी नंदिनीच्या लूकमधील ऐश्वर्याची चाहत्यांना भुरळ; मणिरत्नम यांच्या बिग बजेट चित्रपटाची उत्सुकता
Aishwarya Rai BachchanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 07, 2022 | 11:41 AM

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्या आगामी ‘पोनियिन सेल्वन’ (Ponniyin Selvan: Part 1, PS-1) या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. मणिरत्नम यांच्या प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटात चोल राजवंशातील राणी नंदिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा (Aishwarya Rai Bachchan) फर्स्ट लूक सोशल मीडिया हँडलवर रिलीज केला आहे. या पोस्टरमध्ये ऐश्वर्याच्या सौंदर्याने नेटकऱ्यांना भुरळ पाडली आहे. बऱ्याच कालावधीनंतर ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर झळकतेय. त्यामुळे तिच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या फर्स्ट लूक पोस्टरमध्ये ऐश्वर्याने तांबड्या रंगाची कांजीवरम सिल्क साडी नेसली असून त्यावर भरजरी दागिने परिधान केले आहेत.

ऐश्वर्याची पोस्ट

‘सूडाला एक सुंदर चेहरासुद्धा आहे. भेटा पझुवूरची राणी नंदिनीला! PS-1 हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे,’ असं कॅप्शन देत ऐश्वर्याने हा फोटो पोस्ट केला आहे. एकीकडे हा पोस्टर पाहून चाहते थक्क झालेत तर पती अभिषेक बच्चनकडूनही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. अभिषेकने ऐश्वर्याची ही पोस्ट त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत हृदयाचे इमोटिकॉन पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

पहा फर्स्ट लूक-

या चित्रपटाच्या निमित्ताने ऐश्वर्या आणि दिग्दर्शक मणिरत्नम हे चौथ्यांदा एकत्र काम करत आहेत. यामध्ये अभिनेता विक्रम, जयम रवी, कार्ती, त्रिशा, जयराम, ऐश्वर्या लक्ष्मी, आर. सरथकुमार आणि शोभिता धुलिपाला यांच्याही भूमिका आहेत. मणिरत्नम यांच्या मद्रास टॉकीज आणि लायका प्रॉडक्शनने सह-निर्मिती केली असून, हा चित्रपट कल्की कृष्णमूर्ती यांच्या 1955 मधील पोनियिन सेल्वन या कादंबरीवर आधारित आहे. मार्चमध्ये ऐश्वर्याने चित्रपटातील तिचा पहिला लूक शेअर केला होता. ऐश्वर्या 2018 मध्ये अनिल कपूर आणि राजकुमार रावसोबत ‘फन्ने खान’ या चित्रपटात दिसली होती. तर अभिषेकने अलीकडेच दसवी या चित्रपटात काम केलं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.