“स्थळ चुकलं त्यांचं”; पुणेकर थेट रस्त्यावरच, पंजाबी गायक दीलजीत दोसांजच्या शो ला स्थानिकांचा विरोध… नेमकं कारण काय?
पंजाबी गायक दीलजीत दोसांजचा लाईव्ह शोवरून पुणेकर चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळत आहेत. दीलजीतच्या शोला स्थांनिकांनी विरोध करत हा शो होऊ न देण्याची भूमिका सध्या पुणेकरांनी घेतली आहे.
पंजाबी गायक दीलजीत दोसांजचा लाईव्ह शो म्हटलं की चाहते आवर्जून जातातच. त्याच्या शोला तुफान गर्दी असते. मात्र पु्ण्यातील चित्र जरा वेगळं दिसत आहे. पुण्यातील कोथरूडमध्ये संध्याकाळी होणाऱ्या दीलजीत दोसांजचा लाईव्ह शोला स्थानिकांनीच सरळ सरळ नाकारलं आहे.
कोथरूड परिसरातील काकडे फार्मवर हा कॉन्सर्ट होणार असून स्थानिक रहिवाशांनी आणि मनसेने मात्र या शोला विरोध केलेला पाहायला मिळतोय.. यासाठीच जिथे शो होणार आहे का मैदानाच्या बाहेर आता स्थानिकांनी आंदोलन केलं.
सर्व आनंदोलकांनी त्यांचा विरोध दर्शवण्यासाठी कळ्या फिती बांधल्या होत्या. या शोमध्ये मध्य विक्री देखील केली जाणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर मद्या विक्रीला परवानगी कशी दिली जाते असा सवाल देखील या स्थानिकांना उपस्थित केला आहे.
स्थानिकांना या शोला विरोध करण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितलं की,” आमचा या शोला किंवा त्यांच्या गाण्याला विरोध नाहीये, पण त्यांनी जी जागा निवडली तिला आमचा विरोध आहे. कोथरुडमध्ये ज्या जागेवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याठीकाणी आधीच ट्राफिकची अडचण आहे त्यात या शोमुळे अजून गर्दी होणार आणि त्याचा त्रास इथल्या स्थानिकांना होणार. त्यामुळे त्यांनी ही कार्यक्रमाचे स्थळ बदलावे” असं मत व्यक्त करत या शओला विरोध करण्याचे कारण तिथल्या स्थानिकांनी सांगितले आहे.
दुबईपासून दिल्लीपर्यंत दिलजीत दोसांझचे शो होत असतात. त्याचे संगीत जितके प्रसिद्ध आहे तितकेच त्याची बोलण्याची पद्धत त्याच्या चाहत्यांची मने जिंकते. त्याच्या दिल-लुमिनाटी इंडिया टूरची सध्या खूप चर्चा आहे. दरम्यान, त्यांचा दौरा मुंबईत होणार असून, त्याची तिकिटे आधीच विकली गेली आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कॉन्सर्टची सर्व तिकिटे 50 सेकंदात विकली गेली आहे.
रिपोर्टनुसार, 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता Zomato Live वर तिकीटांची विक्री सुरू झाली. ते सिल्व्हर, गोल्ड, फॅन पिट आणि एमआयपी लाउंज स्टँडिंग श्रेणींमध्ये विभागले गेले. एका तिकिटाची किंमत सिल्व्हर कॅटेगरीची आहे, जवळपास 4999 रुपये असल्याचा दावा करण्यात आला होता. ते अवघ्या 50 सेकंदात विकले गेले.
दिलजीत दोसांझचा मुंबई कॉन्सर्ट, जो दिल-लुमिनाटी इंडिया टूरचा भाग आहे, तो 19 डिसेंबर रोजी होणार आहे. . मात्र, कार्यक्रमाचे मुंबईत कुठे होणार ते ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.