Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त एकाच गाण्याने प्रचंड लोकप्रिय… असा गायक होणार नाही; संपत्तीही कोट्यवधीच्या घरात

प्रसिद्ध पंजाबी गायक एपी ढिल्लों याच्या घरावर बेछुट गोळीबार करण्यात आला आहे. कॅनडा येथील एका आयलँडवर त्याचं घर आहे. या घराच्या बाहेरच बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने हा गोळीबार केला आहे.

फक्त एकाच गाण्याने प्रचंड लोकप्रिय... असा गायक होणार नाही; संपत्तीही कोट्यवधीच्या घरात
A.P. DhillonImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 02, 2024 | 8:53 PM

पंजाबी सिंगर आणि रॅपर एपी ढिल्लो याच्या कॅनडातील वँकूवरमधील व्हिक्टोरिया आयलँड येथील घराच्याबाहेर फायरिंग झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या फायरिंगचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. एका व्यक्तीने मास्क लावला असून तो ढिल्लोंच्या घराबाहेर फायरिंग करताना दिसत आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगचा मेंबर रोहित गोदारा याने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. या फायरिंगमुळे अचानक एपी ढिल्लों चर्चेत आला आहे.

एपी ढिल्लों हा भारतीय वंशाचा आहे. त्याचा जन्म पंजाबच्या गुरुदासपूरचा. पण त्याच्या शिक्षणामुळे त्याचे कुटुंबीय कॅनडात शिफ्ट झाले. ढिल्लोंने त्याच्या गायनाची सुरुवात 2019मध्ये ‘फेक’ आणि ‘फरार’द्वारे केली. त्याला रन-अप रेकॉर्ड्सचं नाव दिलं गेलं. ढिल्लोंने त्याच्या करिअरमध्ये अनेक गाणी गायली. पण 2020च्या ट्रॅक ब्राऊन मुंडेमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. या एका गाण्यामुळे तो प्रसिद्धीच्या शिखरावर आला होता.

2023मध्ये विक्रम

त्यानंतर ढिल्लोंने अनेक लोकप्रिय गाणी दिली. त्यात ‘एक्सक्यूज’, ‘विद यू’ आणि ‘इनसेन’सारख्या गाण्यांचा समावेश आहे. आता 30 ऑगस्ट रोजी त्याचं नुकतंच ‘द ब्राउनप्रिंट’ हे गाणंही रिलीज झालं आहे. 2023मध्ये एपी ढिल्लो प्रतिष्ठेच्या जूनो अॅवार्ड्समध्ये परफॉर्म करणारे पहिले पंजाबी गायकही बनले.

डॉक्युमेंट्रीही आली

पंजाबी गायक आणि रॅपर एपी ढिल्लों यांच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्रीही आली आहे. त्याचं नाव एपी ढिल्लों: फर्स्ट ऑफ ए काइंड असं आहे. गेल्यावर्षी ही डॉक्युमेंट्री प्राइम व्हिडीओवर रिलीज झाली होती. या डॉक्यू-सीरिजमध्ये ढिल्लो याच्या कुटुंबीयांच्या आणि मित्रांच्या मुलाखती आहेत.

कोट्यवधीचे मालक

एपी ढिल्लोंला प्रसिद्धीसह पैसाही प्रचंड मिळाला आहे. एका वृत्तानुसार, त्याच्याकडे एकूण 83 कोटींची संपत्ती आहे. पंजाबमध्ये त्याच्याकडे आलिशान बंगला आहे. सोबतच कॅनडा वँकूवरमध्ये व्हिक्टोरिया आयलँडवर त्याचं शानदार घर आहे.

‘कुत्ते की मौत मरेगा’

दरम्यान, ढिल्लों याला सोशल मीडियावरून धमक्या आल्या होत्या असं सांगितलं जातं. 1 सप्टेंबरच्या रात्री या टोळीने कॅनडाच्या दोन ठिकाणी गोळीबार करण्याचा प्लान केला होता. एक व्हिक्टोरिया बेटावर आणि दुसरा बुडब्रिज येथे गोळीबार करायचा होता. टोरंटो येथे गँगने बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा हवाला देऊन ढिल्लों याला धमकावलं होतं. तुझ्या औकातीत राहा, नाही तर कुत्र्याची मौत मरशील, अशी धमकी त्याला दिली होती, अशी माहिती समोर येत आहे.