प्रसिद्ध गायकाचं अवघ्या 29व्या वर्षी निधन; शहनाज गिल हिच्यासोबतही केलंय काम

| Updated on: May 05, 2023 | 6:43 AM

पंजाबी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक, मॉडल आणि डान्सर कंवल चहल याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचं कारण समोर येऊ शकलं नाही. मात्र, वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी कंवलने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रसिद्ध गायकाचं अवघ्या 29व्या वर्षी निधन; शहनाज गिल हिच्यासोबतही केलंय काम
Kanwar Chahal
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

चंदीगड : पंजाब इंडस्ट्रितील प्रसिद्ध गायक कंवल चहल यांचं गुरुवारी निधन झालं. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी कंवलने जगाचा निरोप घेतला. कंवल चहलने अनेक लोकप्रिय गाणी गायली होती. त्याच्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. कंवलने शहनाज गिलसोबतही काम केलं आहे. कंवलचं अचानक निधन झाल्याने त्याचे कुटुंबीय आणि पंजाबी इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. त्याच्या निधनावर पंजाबमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचं निधन कशामुळे झालं याची माहिती मिळू शकली नाही.

कंवल चहल यांच्या निधनाने पंजाबची म्युझिक इंडस्ट्री दु:खात बुडाली आहे. कंवलच्या पार्थिवावर पंजाबच्या मनसाच्या भीखी येथे अंत्यसंस्कार केला जाणार आहे. यावेळी त्याच्या कुटुंबीयांसह त्याचा मित्र परिवार उपस्थित राहणार आहे. कंवल याच्या निधनाने पंजाबी इंडस्ट्रीला दुसरा धक्का बसला आहे. या आधी प्रसिद्ध गायक निरवैर सिंह यांचा अपघाती मृत्यू झाला. तर लोकप्रिय गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता अचानक कंवल चहल याचं निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

हे सुद्धा वाचा

मॉडेल आणि डान्सरही

कंवलचा जन्म 22 जून 1993मध्ये पटियाला येथे झाला होता. तो 2005पासून कॅनडात राहत होता. तो केवळ गायकच नव्हता. तर मॉडेल आणि डान्सरही होता. 2014मध्ये इंटर कॉलेज यूथ फेस्टिव्हलमध्ये त्याला बेस्ट डान्सरचा पुरस्कारही मिळाला होता. त्याचे आईवडील डॉक्टर होते.

बहिणीकडून गाण्याचे धडे

‘गल सुनजा’ हे या गाण्याने त्याला ओळख मिळवून दिली होती. मोठ्या बहिणीकडून त्याने संगीताचे धडे गिरवले होते. ‘इक वार’, ‘डोर’ आणि ‘ब्रांड’साठी त्याने गाणी गायली होती. तो सोशल मीडिया इन्फ्लून्सर होता. आपल्या दैनंदिन घडामोडींबाबत आपल्या फॅन्सला माहिती द्यायला त्याला आवडायचे. त्यामुळे तो चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होता. शहनाज गिल सोबत त्यााने ‘माझे दी जट्टी’मध्ये काम केले होते.