Pushpa The Rise | प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा नवा विक्रम!

साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चित्रपटाने प्रदर्शना आधीच 250 कोटींची कमाई केली आहे. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा’ (Pushpa) रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर दिग्दर्शक सुकुमार यांचा चित्रपट हा तिघांचा एकत्र असा पहिलाच चित्रपट आहे.

Pushpa The Rise | प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधींची कमाई, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’चा नवा विक्रम!
Allu Arjun
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 12:02 PM

मुंबई : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) चित्रपटाने प्रदर्शना आधीच 250 कोटींची कमाई केली आहे. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा’ (Pushpa) रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर दिग्दर्शक सुकुमार यांचा चित्रपट हा तिघांचा एकत्र असा पहिलाच चित्रपट आहे. जो तामिळ, तेलुगु आणि हिंदी व्यतिरिक्त मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान, चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही सुरू झाले आहे. ‘मेगा बजेट’ असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. दरम्यान, या चित्रपटाने रिलीजपूर्वीच करोडोंची कमाई केल्याचे वृत्त आहे.

ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट ‘पुष्पा’ने रिलीज होण्याआधीच 250 कोटी रुपयांची मोठी कमाई केली आहे. वृत्तानुसार, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या चित्रपटाने डिजिटल अधिकार आणि ओटीटी रिलीज अधिकारांद्वारे ही कमाई केली आहे. यासह चित्रपटाने त्याच्या मेकिंग खर्चाचा मोठा हिस्सा आधीच वसूल केला आहे.

प्रमोशन दिसेना!

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर फिल्म पुष्पा या महिन्यात 17 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस गल्ल्याकडे लागल्या आहेत. हिंदी भाषिक प्रदेशात अजूनही या चित्रपटाचे प्रमोशन मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले नाही. जी या चित्रपटासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर यापूर्वीच रिलीज झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाची कथा चंदन तस्करीभोवती विणलेली आहे. मल्याळम स्टार फहाद फासिल या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहे. तर ‘डीजे’ स्टार अल्लू अर्जुनच्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत रश्मिका मंदना मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

चंदन तस्कराविरोधातील लढा

‘पुष्पा द राईज’ या चित्रपटात चंदन तस्करीची कथा दाखवण्यात येणार आहे, ज्याच्या विरोधात अल्लू अर्जुन लढताना दिसणार आहे. चित्रपटात अल्लू अर्जुन स्थानिक रहिवासी पुष्पा राजची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात अर्जुन एका ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसणार आहे, जो लाल चंदनाची तस्करी करतो. या चित्रपटात अर्जुन व्यतिरिक्त फहाद फासिल, रश्मिका मंदान्ना आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. पुष्पाची व्यक्तिरेखा अत्यंत निर्भय आहे, त्यामुळे तो प्रत्येक समस्येला अतिशय चपखलपणे हाताळतो. त्याचवेळी, चित्रपटातील रश्मिका मंदनाची व्यक्तिरेखा एका स्थानिक मुलीची आहे, जिच्यावर पुष्पा खूप प्रेम करतो.

पहिल्यांदाच दिसणार अल्लू-रश्मिकाची जोडी

‘पुष्पा द राईज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रिलीज होणार आहे, ज्यामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदना पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. हा चित्रपट तेलगू, तामिळ, हिंदी, मल्याळम आणि कन्नड या सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. समंथाचा डान्स नंबर याच चित्रपटात आहे, ज्याबद्दल निर्माते खूप उत्सुक होते. पण आता चित्रपटाचे लोकप्रिय गाणे वादात अडकल्याने, चित्रपट देखील आता वादात सापडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा :

Vicky-Ankita Wedding | ‘आज मेरे यार की शादी है..’ अंकिता लोखंडे-विकी जैनच्या संगीत सोहळ्याला कंगनाने लावले चार चांद!

Happy Birthday Rana Daggubati | फोटोग्राफीचे व्यवसायिक शिक्षण, अभिनयच नव्हे ‘या’ क्षेत्रातही राणा दग्गुबाती अव्वल!

Happy Birthday Sameera Reddy | आई झाल्यानंतर नैराश्यात गेली, आता मनोरंजन विश्वापासून दूर राहतेय समीरा रेड्डी!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.