Video | ‘सगळ्यांना माझा नमस्कार….!’, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन जेव्हा मराठीत बोलतो…

अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिका असलेला 'पुष्पा द राईज'  या चित्रपटाचा पहिला भाग नुकताच चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त अशी कमाई केली आहे.

Video | ‘सगळ्यांना माझा नमस्कार....!’, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन जेव्हा मराठीत बोलतो...
Allu Arjun
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 4:06 PM

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा द राईज’  या चित्रपटाचा पहिला भाग नुकताच चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त अशी कमाई केली आहे. सध्या सगळीकडे या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळतेय. अल्लू अर्जुनची धडाकेबाज शैली तर, रश्मिकाच्या सौंदर्याने प्रेक्षक घायाळ झाले आहेत. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. नुकत्याच एका कार्यक्रमा दरम्यान अल्लू अर्जुनने चक्क मराठीत संवाद साधल्याने त्याचे देखील कौतुक होत आहे.

या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे तर, पुष्पा राज (अल्लू अर्जुन) हा एक दुष्ट लाल चंदन तस्कर आहे, जो या दुष्ट चक्रामध्ये वेगाने वाढतो आहे. यादरम्यान त्याला पोलिस खात्याशीही सामना करावा लागतो. तिरुपतीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बनवला गेला आहे. या चित्रपटात रश्मिकाने अल्लू अर्जुनच्या मैत्रिणीची भूमिका साकारली आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. अशाच एका प्रमोशन सोहळ्यादरम्यान अल्लूने चक्क मराठी ‘सगळ्यांना माझा नमस्कार…’ असं म्हणत चाहत्यांशी संवाद साधला आहे. सध्या अल्लू अर्जुनचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ :

‘सुपरस्टार’ अल्लु अर्जुन याचा ‘पुष्पा’ चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. आंध्र प्रदेशमधल्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट दोन वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज केला जाणार आहे. नुकताच याचा पहिला भाग रिलीज झाला आहे.

अॅक्शन आणि संवादांनी परिपूर्ण

‘पुष्पा द राईज’ विषयी सांगायचे, तर हा चित्रपट अॅक्शन आणि संवादांनी परिपूर्ण आहे. अल्लू अर्जुन हा ‘वन मॅन आर्मी’ सारख्या चित्रपटातून सर्वांची मने जिंकताना दिसला आहे. त्याची बॉडी लँग्वेज, डायलॉग डिलिव्हरी, अॅक्शन जबरदस्त आहे. चित्रपट पूर्ण त्याच्या अ‍ॅक्शनने भरलेला आहे. रोहित शेट्टीच्या चित्रपटाप्रमाणेच अॅक्शन सिक्वेन्सही धमाकेदार आहेत. अल्लू आणि रश्मिकाची प्रेमकहाणी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करते. विशेषत: मध्यांतरानंतरची काही दृश्ये अतिशय प्रेक्षणीय आहेत.

हेही वाचा :

Money Laundering Case : बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुरुंगात जाऊनही घेतली सुकेश चंद्रशेखरची भेट, अनेक सेलिब्रिटी गोत्यात येणार!

Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?

Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.