Trailer Out | आर माधवन आणि खुशाली कुमारच्या धोखा राऊंड द कॉर्नर चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज…
चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते अधिकच उत्सुक झाले असून आता चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहिली जातयं. ट्रेलरमध्ये आर माधवन आणि खुशाली कुमार हे दिसत असून चित्रपटामध्ये यांची भूमिका नेमकी काय हे देखील ओळखू येते आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वीच ‘धोखा राऊंड द कॉर्नर’च्या (Dhokha Round D Corner) निर्मात्यांनी चित्रपटाचा एक टीझर रिलीज केला होता. विशेष म्हणजे या टिझरला प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळालायं. यामुळे चित्रपटाचे दिग्दर्शक कुकी गुलाटी खुश होते. आता नुकतेच काल 10 सप्टेंबर रोजी धोखा राऊंड द कॉर्नर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Trailer release) करण्यात आलायं. चित्रपटाचा हा ट्रेलर अतिशय मनोरंजक दिसतोय. धोखा राऊंड द कॉर्नर चित्रपटामध्ये आर माधवन, खुशाली कुमार, दर्शन कुमार आणि अपारशक्ती खुराना (Aparshakti Khurana) हे प्रमुख भूमिकेत आहेत.
आर माधवन आणि खुशाली कुमार यांची चित्रपटात महत्वाची भूमिका
चित्रपटाचा ट्रेलर पाहून चाहते अधिकच उत्सुक झाले असून आता चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहिली जातयं. ट्रेलरमध्ये आर माधवन आणि खुशाली कुमार हे दिसत असून चित्रपटामध्ये यांची भूमिका नेमकी काय हे देखील ओळखू येते आहे. हे पात्र सर्वसामान्य लोकांसारखे आपले वैवाहिक जीवन जगताना दिसते असून एका घटनेने त्याचे आयुष्य संपूर्ण बदलून जाते. पुढे ते कशाप्रकारे संघर्ष करता हे चित्रपटामध्ये दाखवण्यात आले.
अपारशक्ती खुरानाचा चित्रपटात जबरदस्त अभिनयाचा तडका
अपारशक्ती खुरानाच्या एंट्रीनंतर चित्रपटात हा नवा ट्विस्ट येतो. ट्रेलरमधून प्रेक्षकांना चित्रपटाची कल्पना मिळतयं. या चित्रपटामध्ये प्रेम आणि थरार हे दोन्हीसोबतच बघायला मिळणार आहे. चित्रपटात आर माधवन, खुशहाली कुमार, अपारशक्ती खुराणासोबत ‘द काश्मीर फाइल’ फेम दर्शन कुमारही दिसणार आहेत. हा चित्रपट चाहत्यांना नक्कीच आवडणार हे चित्रपटाच्या ट्रेलरवरून दिसते आहे.