R Madhavan: ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशावर आर. माधवनची प्रतिक्रिया; म्हणाला “”आम्हाला जर माहीत असतं तर..”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता आर. माधवनने (R Madhavan) यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटांची दाक्षिणात्य चित्रपटांशी होणारी तुलना, यावरही त्याने भाष्य केलं.

R Madhavan: 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशावर आर. माधवनची प्रतिक्रिया; म्हणाला आम्हाला जर माहीत असतं तर..
R Madhavan: 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशावर आर. माधवनची प्रतिक्रियाImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 10:26 AM

आमिर खानच्या (Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) या चित्रपटाला अपेक्षित असा प्रतिसाद मिळू शकला नाही. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर, मोना सिंग आणि नाग चैतन्य यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पहिल्या सहा दिवसांत कमाईचा 50 कोटी रुपयांचा आकडाही हा चित्रपट पार करू शकला नाही. गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचे बरेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटताना दिसत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता आर. माधवनने (R Madhavan) यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे हिंदी चित्रपटांची दाक्षिणात्य चित्रपटांशी होणारी तुलना, यावरही त्याने भाष्य केलं. आतापर्यंत या वर्षातील सम्राट पृथ्वीराज, शमशेरा हे चित्रपटसुद्धा अपेक्षित कमाई करू शकले नाहीत. तर दुसरीकडे RRR, केजीएफ: चाप्टर 2, विक्रम, विक्रांत रोना, पुष्पा यांसारख्या चित्रपटांनी कमाईचे नवीन विक्रम रचले आहेत. इतकंच नव्हे तर या चित्रपटांच्या हिंदी डबिंग व्हर्जननेही दमदार कामगिरी केली.

आपल्या आगामी ‘धोखा: राऊंड डी कॉर्नर’ या चित्रपटाच्या टीझर लाँचदरम्यान माधवनला हिंदी चित्रपटांच्या अपयशाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला, “आम्हाला जर माहित असतं की लाल सिंग चड्ढासारखा चित्रपट चालणार नाही, तर आम्ही सर्वजण फक्त हिट चित्रपट बनवत असतो. आपण चुकीचा चित्रपट बनवतोय असा विचार करून कोणीच कामाला सुरुवात करत नाही. चांगला चित्रपट बनवण्याच्या हेतूनेच प्रत्येकजण काम करतो. दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, बाहुबली 1, बाहुबली 2, RRR, पुष्पा, केजीएफ: चाप्टर 1 आणि केजीएफ: चाप्टर 2 या एवढ्याच चित्रपटांनी हिंदीपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. हे फक्त सहा चित्रपट आहेत, आपण याला पॅटर्न म्हणू शकत नाही. चांगला चित्रपट असेल तर तो बॉक्स ऑफिसवर नक्कीच चालेल.”

चित्रपटाची कथा चांगली असेल तर भाषेचा विचार न करता प्रेक्षक थिएटरमध्ये तो चित्रपट पाहायला जाईल, असंही मत त्याने व्यक्त केलं. “कोविड महामारीनंतर लोकांच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. त्यामुळे आपल्याला थोडा पुढचा विचार करावा लागेल”, असं तो म्हणाला. माधवनचा आगामी ‘धोखा: राऊंड डी कॉर्नर’ हा चित्रपट 23 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत दर्शन कुमार, अपारशक्ती खुराना आणि खुशाली कुमार यांच्या भूमिका आहेत.

हे सुद्धा वाचा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.