Radheshyam : ‘राधेश्याम’ येणार आपल्या ठरलेल्या तारखेलाच; मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित!

'राधेश्याम'च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी जाहीर केलेल्या तारखेवरच चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. प्रभास-पूजा अभिनीत हा चित्रपट 14 जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता, जो दक्षिणेत एक मोठा वीकेंड आहे कारण त्यादिवशी पोंगल असणार आहे आणि तो या चित्रपटासाठी एक खूपच शुभ दिवस असेल. ('Radheshyam' will come on scheduled date; To be screened on the occasion of Makar Sankranti!)

Radheshyam : 'राधेश्याम' येणार आपल्या ठरलेल्या तारखेलाच; मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित!
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 3:51 PM

मुंबई : प्रभास आणि पूजा हेगड़े अभिनीत, ‘राधेश्याम’च्या (Radheshyam) घोषणेपासूनच दर्शकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे हा चित्रपट एक प्रेम कहाणी आहे आणि प्रभास दशकभरानंतर पुन्हा एकदा रोमांटिक भूमिकेत दिसणार आहे आणि त्यामुळेच त्याचे चाहते हा रोमांटिक-ड्रामा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

‘राधेश्याम’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी जाहीर केलेल्या तारखेवरच चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. प्रभास-पूजा अभिनीत हा चित्रपट 14 जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता, जो दक्षिणेत एक मोठा वीकेंड आहे कारण त्यादिवशी पोंगल असणार आहे आणि तो या चित्रपटासाठी एक खूपच शुभ दिवस असेल.

वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेगवेगळ्या पोस्टर्समुळे चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. ‘लवर बॉय’ अवतारातील प्रभासची झलक दर्शकांच्या पसंतीस उतरत असून रोमांटिक शहर इटलीच्या सुंदर बॅकड्रॉपने हा उत्साह द्विगुणित केला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक विंटेज, ओल्ड स्कूल आणि ड्रीमी वाइब्सचा समावेश असून चित्रपटातील प्रभास आणि पूजा हेगडे यांची केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली आहे.

चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे

‘राधेश्याम’ एक नितांत सुंदर प्रेम कहाणी आहे जी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पॅन इंडिया सुपरस्टार प्रभास आणि सुंदर पूजा हेगडे अभिनीत हा बहुभाषी चित्रपट, राधा कृष्ण कुमार यांच्याद्वारे दिग्दर्शित असून गुलशन कुमार आणि टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत करण्यात आली आहे. हा चित्रपट यूवी क्रिएशंसची निर्मिती आहे. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

राधे श्याम एका मेगा कॅनव्हासवर अवतरणार

प्रसिद्ध दिग्दर्शिक राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटातील ही एक बहुभाषिक प्रेमकथा 1970 मध्ये युरोपमध्ये घडते. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीत झालेला हा चित्रपट आहे. सोबतच अत्याधुनिक व्हिज्युअल इफेक्ट्सनं सज्ज राधे श्याम एका मेगा कॅनव्हासवर अवतरणार आहे, यामध्ये प्रभास आणि पूजा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या रूपात दिसणार आहेत.

दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांनी व्यक्त केल्या भावना

दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार म्हणाले की, ‘या चित्रपटावर आम्ही खूप मेहनत घेतली आहे आणि आम्ही प्रेक्षकांना एक भव्य नाट्यानुभव देण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. राधे श्याम 14 जानेवारी 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून जन्माष्टमीच्या या विशेष दिवशी चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.’

राधेश्याम हा बहुभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरिज यांची प्रस्तुती आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केलं आहे. यूव्ही क्रिएशन्सनं तयार केलेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

प्रभासने 2002मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ईश्वर’ या तेलुगु चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केले होते. यानंतर तो ‘राघवेंद्र’, ‘योगी’, ‘डार्लिंग’, ‘निरंजन’, ‘रेबेल’ आणि ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही भागांत झळकला होता. प्रभुदेवा दिग्दर्शित ‘अॅक्शन जॅक्शन या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तो लहानशा भूमिकेत झळकला होता. प्रभासचा वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी ‘राधेश्याम’ चित्रपटातील त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. प्रभासच्या वाढदिवसानिमित्ताने या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले होते. त्या पोस्टरमध्ये प्रभासचा डॅशिंग आणि स्टाइलिश लूक दिसला होता.

संबंधित बातम्या

Aai Kuthe Kay Karte | संजना आणि अरुंधती दोघींचीही होणार नवी सुरुवात, सांभाळू शकतील का नवीन जबाबदारी?

Gautami Deshpande : पाहा! गौतमी देशपांडेंचं निखळ खळखळतं हास्य अन् ब्रिटनच्या राणीसारखा लूक; चाहते म्हणतात…

Sardar Udham Trailer Out : स्वातंत्र्याची धगधगती आग, देशप्रेमाचा सळसळता उत्साह, पाहा विकी कौशलच्या ‘सरदार उधम’चा ट्रेलर

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.