‘आतासुद्धा अडल्ट फिल्मचा बिझनेस करतोस का?’, राज कुंद्राने युजरला दिलं उत्तर

पॉर्नोग्राफी प्रकरणाबद्दल नेटकऱ्याचा राज कुंद्राला थेट सवाल

'आतासुद्धा अडल्ट फिल्मचा बिझनेस करतोस का?', राज कुंद्राने युजरला दिलं उत्तर
Raj Kundra
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 7:39 PM

मुंबई- तुरुंगातून सुटल्यानंतर जवळपास वर्षभराने व्यावसायिक आणि अभिनेता शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने पॉर्नोग्राफी प्रकरणावर भाष्य केलं आहे. राजने ट्विटरच्या माध्यमातून नेटकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तिने युजर्सना प्रश्न विचारण्याची मुभा दिली. या प्रश्नांची उत्तरं राजनेही मोकळेपणे दिली. यावेळी काही युजर्सनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही राजने सडेतोड उत्तर दिलं.

‘तुला अटक कशी झाली? या प्रकरणात तू कसा अडकलास किंवा शाहरुख खानचा मुलगा आर्यनप्रमाणे तुलाही अडकवलं गेलं? जर तू प्रामाणिक असशील तर पॉर्नोग्राफी प्रकरणात कोण सहभागी होतं ते आम्हाला सांग’, असं एका युजरने विचारलं.

त्यावर उत्तर देताना राज म्हणाला, “याचं उत्तर लवकरच सर्वांसमोर येईल. भष्ट्राचार, वैर, शत्रुत्व या सर्वांचा त्यात समावेश होता. माझ्या शुभचिंतकांना मी एक गोष्ट सांगू शकतो की मी आयुष्यात कोणत्याच प्रकारच्या पॉर्नोग्राफी निर्मितीत सहभागी नव्हतो किंवा मी स्वत: त्या गोष्टींची निर्मिती केली नाही.”

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. जामिनाला वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) पत्र लिहून या प्रकरणात न्यायाची मागणी केली.

राजला अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टी त्याला घटस्फोट देणार असल्याचीही जोरदार चर्चा होती. मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर दोघं अजूनही एकत्र असल्याने हे नाटक आहे की प्रेम असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला. त्यावर उत्तर देताना राज म्हणाला, “मला हा प्रश्न आवडला. प्रेम हे नाटक नसतं आणि ते दिखाव्यासाठी करता येत नाही. येत्या 22 नोव्हेंबर रोजी आमच्या लग्नाचा 13 वा वाढदिवस आहे. त्यादिवशी आम्हाला शुभेच्छा द्यायला विसरू नकोस.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.