20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा!
राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra ) आणि पूनम पांडे (Poonam Pandey) यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई : राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra ) आणि पूनम पांडे (Poonam Pandey) यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दोघांना अटकपूर्व जामीन देखील मिळाला आहे. यासह कोर्टाने मुंबई पोलिसांना 20 सप्टेंबरपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश दिले आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शर्लिन चोप्राला चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
बातमीनुसार शार्लिनला सकाळी 11 वाजता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावले होते. शार्लिन चोप्रा यांनी गेल्या काही दिवसांत राज कुंद्रा प्रकरणात अनेक खुलासे केले आहेत. त्यांनी राज कुंद्राच्या एका कंपनीविषयी सांगितले जी मॉडेलसाठी अॅप्स बनवते. व्हिडीओ शेअर करून तिने या कंपनीबद्दल सांगितले होते.
महाराष्ट्र सायबर सेलमध्ये नोंदवण्यात आले निवेदन
शर्लिन चोप्रा हिने काही काळापूर्वी सांगितले होते की, तिने महाराष्ट्र सायबर सेलमध्ये आपले निवेदन नोंदवले आहे. ती म्हणाली होती की, या प्रकरणात आवाज उठवणारी मी पहिली व्यक्ती होते. तिने सांगितले होते की, मला सायबर सेलने बोलावल्यानंतर मी भूमिगत झाले नाही किंवा हे शहर सोडून पळून देखील गेले नाही. मी माझा जबाब रेकॉर्ड केला आहे, माझ्या जबाबाची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही सायबर सेलशी संपर्क साधू शकता.
पूनम पांडेचेही अनेक खुलासे
अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे हिने देखील राज कुंद्रा प्रकरणात अनेक खुलासे केले आहेत. आपल्याला एका करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले होते, असे तिने म्हटले होते. जेव्हा त्याने असे करण्यास नकार दिला, तेव्हा तिच्या वैयक्तिक गोष्टी लीक करण्याची धमकी देण्यात आली.
राज कुंद्राला दिलासा नाही!
राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी कोर्टाकडून आणखी एक मोठा धक्का बसला आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा याला मुंबईच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी रात्री उशिरा अटक केली होती. त्यानंतर 20 जुलै रोजी कोर्टाने त्याला 3 दिवसांच्या पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर 23 जुलै रोजी पुन्हा सुनावणी झाली असता कोर्टाने राजला 27 जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती. आता पुन्हा यात वाढ करण्यात आली आहे.
राज कुंद्रा याच्या घरातून अनेक महत्त्वपूर्ण पुरावे सापडल्याचे क्राइम ब्रँचने कोर्टाला सांगितले आहे. अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात एका फॉरेन्सिक तज्ज्ञाची नेमणूक करण्यात आली आहे. ज्याच्या मदतीने डेटा परत मिळवला जात आहे. राज यांच्या घरातून हार्ड डिस्क व मोबाईल सापडला आहे. आयओएसवर आरोपींकडून हॉटशॉट्स दाखवले जात असताना त्यांना Apple कडून 1 कोटी 13 लाख 64,886 रुपये मिळाले होते. ज्या खात्यांमध्ये ही रक्कम जमा केली गेली होती ती कोटक महिंद्र बँक, येस बँक आणि अन्य बँक खाती गोठवली गेली आहेत. आता काही फरार आरोपींचाही शोध सुरू आहे.
(Raj Kundra Case High Court gives relief to Sherlyn Chopra and Poonam Pandey)
संबंधित बातम्या :
अश्लील चित्रपटाच्या हिंदी स्क्रिप्ट मिळाल्या, तपासात अनेक खुलासे, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ
Raj Kundra | राज कुंद्राच्या काळ्या पैशांचं रहस्य पंजाब नॅशनल बँकेतील खात्यात दडलंय?