Raj Kundra Case | अटक होण्याची भीती, चौकशी होण्यापूर्वीच शर्लिन चोप्राने ठोठावला कोर्टाचा दरवाजा

राज कुंद्रा (raj kundra) अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn chopra) हिला आज (27 जुलै) मंगळवारी मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलसमोर चौकशीसाठी हजर व्हावं लागणार आहे.

Raj Kundra Case | अटक होण्याची भीती, चौकशी होण्यापूर्वीच शर्लिन चोप्राने ठोठावला कोर्टाचा दरवाजा
शर्लिन चोप्रा
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 12:04 PM

मुंबई : राज कुंद्रा (raj kundra) अश्लील चित्रपट प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn chopra) हिला आज (27 जुलै) मंगळवारी मुंबई पोलिसांच्या प्रॉपर्टी सेलसमोर चौकशीसाठी हजर व्हावं लागणार आहे. शर्लिन चोप्राला मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात आपले निवेदन नोंदवण्यासाठी बोलावले होते. मात्र, चौकशीपूर्वीच शर्लिन चोप्रा हिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शर्लिन चोप्रा हिने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

ऑनलाईन माध्यमांच्या वृत्तानुसार, शार्लिन चोप्रा हिने मुंबई क्राईम ब्रँचला सांगितले की, प्रॉपर्टी सेलमध्ये आपले निवेदन नोंदवण्यापूर्वी ती न्यायालयात जाईल. यावेळी शर्लिनने कोर्टात अर्ज दिला आहे. शर्लिनला मंगळवारी सकाळी 11 वाजता पोलिसांनी तिचे निवेदन नोंदवण्यासाठी बोलावले होते. अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याच्या शर्लिनच्या या कृतीमुळे अभिनेत्रीला तिच्या अटकेची भीती वाटते आहे, असे कळते आहे.

शर्लिन चोप्राचा राज कुंद्राबरोबरचा करार

सूत्रांनी सांगितले की, शर्लिन चोप्राचा राज कुंद्राच्या फर्म आर्म्सप्राइम मीडियाबरोबर करार होता. हा करार भारताबाहेर कंपन्यांच्या काही अ‍ॅप्ससाठी अश्लील सामग्री पुरवण्याचा होता. तिचे माजी वकील चरणजित चंद्रपाल यांच्या म्हणण्यानुसार शर्लिन तिचा अ‍ॅप सेमी पॉर्न पद्धतीने चालवत असे. तिचे हे पार्टटाईम काम फार चांगले चालले नव्हते आणि काही काळानंतर शार्लिनला कुंद्राने स्पॉट केले. राज कुंद्राने शर्लिन चोप्राला सांगितले की, तिला या बदल्यात 50% नफा मिळेल. राज यांनी स्वत: या करारावर सही केली होती.

शर्लिन चोप्राने आपल्या निवेदनात बरेच दावे केले

एएनआयच्या म्हणण्यानुसार, मुंबई पोलिसांनी सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उद्या सकाळी 11 वाजता अभिनेत्री शर्लिन चोप्राला अश्लील चित्रपट प्रकरणात तिचे निवेदन नोंदवण्यासाठी गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने बोलावले आहे. काही दिवसांपूर्वीच राज कुंद्रा प्रकरणात शर्लिन चोप्राने एका कंपनीच्या नावाचा खुलासा केला होता, जी मॉडेलसाठी अ‍ॅप्स बनवते. शर्लिनने तिच्या एका व्हिडीओद्वारे हा दावा केला आहे.

त्याचबरोबर तिने असेही म्हटले होते की, मी पहिली व्यक्ती आहे जिने हे प्रकरण उघडकीस आणले. शार्लिनने असेही सांगितले होते की, तिने मार्च 2021मध्ये महाराष्ट्र सायबर सेलकडे आपले निवेदन नोंदवले होते. व्हिडीओमध्ये शर्लिन म्हणाली होती की, गेल्या अनेक दिवसांपासून या विषयावर माझे मत जाणून घेण्यासाठी अनेक पत्रकार माझ्याशी संपर्क साधत आहेत. मी तुम्हाला सांगते की, सायबर सेलसमोर मी पहिले विधान केले. सध्या हे प्रकरण चालू आहे, म्हणून मी यावर जास्त बोलणार नाही. जेव्हा मला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावले, तेव्हा मी भूमिगत झाले नाही किंवा मी पळूनही गेले नाही.

(Raj Kundra Case Sherlyn chopra move to bombay high court for anticipatory bail)

हेही वाचा :

अश्लील चित्रपटाच्या हिंदी स्क्रिप्ट मिळाल्या, तपासात अनेक खुलासे, राज कुंद्राच्या अडचणीत वाढ

Raj Kundra | राज कुंद्राच्या काळ्या पैशांचं रहस्य पंजाब नॅशनल बँकेतील खात्यात दडलंय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.