Raj Kundra Case : पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला जामीन नाहीच, आता सुनावणी 20 ऑगस्टला

जामिनाला विरोध करत गुन्हे शाखेने नमूद केले की कुंद्रा 'पुराव्यांशी छेडछाड' करू शकतो आणि 'साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो'. त्यांनी हे देखील निदर्शनास आणलं की तो एक ब्रिटिश नागरिक असल्याने, तो देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Raj Kundra case: Shilpa Shetty's husband Raj Kundra not granted bail, hearing on August 20)

Raj Kundra Case : पॉर्नोग्राफी प्रकरणी शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला जामीन नाहीच, आता सुनावणी 20 ऑगस्टला
राज कुंद्रा
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 1:08 PM

मुंबई : व्यवसायिक राज कुंद्राच्या (Raj Kundra) तुरुंगवासाची मुदत मंगळवारी सत्र न्यायालयाने वाढवली आहे. अश्लील सामग्रीची निर्मिती आणि अपलोड केल्याच्या आरोपावरून त्यांच्या जामिनाची सुनावणी आता 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Actress Shilpa Shetty) पती 19 जुलैपासून कोठडीत आहेत. त्यांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंगळवारी संपली, मात्र, गुन्हे शाखेनं 19 कारणं देत त्याला विरोध केला त्यामुळे आता न्यायालयानं ही सुनावणी पुढे ढकलली आहे.

‘कुंद्रा या प्रकरणात सहकार्य करत नाहीत’

मिड-डेनं दिलेल्या वृत्तानुसार, गुन्हे शाखेनं न्यायालयाला सांगितले की, कुंद्रा या प्रकरणात सहकार्य करत नाहीत, त्यांची चौकशी सुरू आहे, सोबतच अजून बरेच साक्षीदार आणि बळी साक्ष नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत. तसेच अनेक पुरावे गोळा करणे बाकी आहे.

‘राज कुंद्रा देश सोडून पळून जाण्याची शक्यता’ 

जामिनाला विरोध करत गुन्हे शाखेने नमूद केले की कुंद्रा एक प्रभावशाली व्यक्ती असल्यानं तो ‘पुराव्यांशी छेडछाड’ करू शकतो आणि ‘साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो’. त्यांनी हे देखील निदर्शनास आणलं की तो एक ब्रिटिश नागरिक असल्याने, तो देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तपास अधिकारी किरण बिडवे यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे की, कुंद्राला अटक होण्यापूर्वी बरेच पुरावे नष्ट करण्यात आले आहेत आणि जामीन दिल्यास तो अधिक पुरावे मिटवू शकतो.

कुंद्रा लंडनमध्ये नोंदणीकृत केनरीन लिमिटेडच्या माध्यमातून हॉटशॉट्स अॅप नियंत्रित करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे, हे अॅप त्यांचे मेहुणे प्रदीप बक्षी यांचं असल्याचंही म्हटलं जातंय.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अटकेनंतर पहिल्यांदाच चाहत्यांसमोर येण्यासाठी सज्ज झाली आहे. माध्यम अहवालानुसार, शिल्पा 15 ऑगस्ट रोजी “वी फॉर इंडिया”च्या माध्यमातून फेसबुक लाईव्हवर करणार आहे.

शिल्पा शेट्टी ‘गिव्ह इंडिया’ मोहिमेत सामील होणार

शिल्पा व्यतिरिक्त, या मोहिमेत अर्जुन कपूर (Arjun Kapoor), विद्या बालन  (Vidya Balan), दिया मिर्झा (Dia Mirza), एड शीरन (Ed Sheeran) , करण जोहर (Karan Johar), परिणीती चोप्रा (Parineeti Chopra), सैफ अली खान (Saif Ali Khan), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि स्टीव्हन स्पीलबर्ग, संगीतकार ए आर रहमान, रोलिंग स्टोन्सचे मिक जॅगर, गायक-गीतकार एड यांचा देखील समावेश आहे.

संबंधित बातम्या

KBC 13 Schedule: प्रतिक्षा संपली, अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती 13’ चं वेळापत्रक जारी

Happy Birthday Suniel Shetty | ‘हिरो’च नाही तर ‘व्हिलन’ बनूनही सुनील शेट्टीने गाजवला मोठा पडदा, निर्माता म्हणूनही आजमावले नशीब!

Renuka Shahane Falling Scene | ‘हम आपके हैं कौन’च्या दिग्दर्शकाच्या ‘या’ चातुर्यामुळे जिन्यावरुन गडगडताना रेणुका शहाणेंना अजिबात दुखापत झाली नाही

Non Stop LIVE Update
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका
'भाजपनं शब्द मोडला; त्यांनी आता मौलानाचा फोटो..', मनसे नेत्याची टीका.
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?
मनसेचं इंजिन राज ठाकरेंच्या हातून जाणार? एकही विजय नाही, फटका बसणार?.
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?
अजित पवारांचा पवार गटाच्या विजयी उमेदवाराला फोन... दादा काय म्हणाले?.
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.